केपटाऊन Ryan Rickelton Double Hundred : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जात असलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना न्यूलँड्सच्या केपटाऊन मैदानावर खेळला जात आहे, ज्यात आतापर्यंत यजमान आफ्रिकन संघाचं वर्चस्व दिसून आलं आहे ज्यात त्यांनी पहिल्या डावात 400 हून अधिक धावा केल्या आहेत. यात दक्षिण आफ्रिकेसाठी प्रथमच कसोटीत सलामीला आलेल्या रायन रिकेल्टनच्या बॅटमधून उत्कृष्ट द्विशतक झळकावलं. त्याच्या खेळीच्या जोरावर रायननं जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी एक नवा इतिहासही रचला आहे, ज्यात तो WTC मध्ये आफ्रिकेसाठी द्विशतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
Ryan Rickleton etches his name in the history books with a maiden Test double-hundred 💯💯
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 4, 2025
Soak it all up Ryan, this is your moment!#WozaNawe #BePartOfIt #SAvPAK pic.twitter.com/8YTrEXyjdG
केले अनेक विक्रम : रायन रिकेल्टनला कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच दक्षिण आफ्रिकेकडून सलामीच्या फलंदाजीत खेळण्याची संधी मिळाली, ज्याचा त्यानं पुरेपूर फायदा घेतला. प्रथमच कसोटीत सलामीवीर म्हणून खेळताना द्विशतक झळकावणारा रायन हा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा आणि जागतिक क्रिकेटमधील चौथा खेळाडू ठरला आहे. रायनच्या आधी 1987 मध्ये श्रीलंकेसाठी ब्रेंडन कुरुप्पू, आफ्रिकेसाठी ग्रॅमी स्टिम आणि त्यानंतर डेव्हॉन कॉनवे यांची नावं या यादीत समाविष्ट आहेत. 2016 नंतर प्रथमच दक्षिण आफ्रिकेतील खेळाडूनं कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्यात यश मिळवले आहे. यापूर्वी 2016 साली बेन स्टोक्स आणि हसिम आमला या दोघांनी द्विशतक झळकावलं होतं आणि या सामन्यात शतक झळकावणारा टेंबा बावुमा त्यातही शतक झळकावण्यात यशस्वी ठरला होता.
⚪️🟢 It's 107 overs gone and we go into the lunch break on 429-5.
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 4, 2025
Ryan Rickelton (213*) and Kyle Verreynne (74*) share in a 106-run partnership.#WozaNawe #BePartOfIt #SAvPAK pic.twitter.com/nSOP337e61
कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच सलामीला येत द्विशतक झळकावणारे खेळाडू :
- रायन रिकेल्टन (दक्षिण आफ्रिका) - वि पाकिस्तान (केप टाऊन, 2025)
- ब्रेंडन कुरुप्पू (श्रीलंका) - विरुद्ध न्यूझीलंड (कोलंबो, 1987)
- ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका) - विरुद्ध बांगलादेश (लंडन, 2002)
- डेव्हॉन कॉनवे (न्यूझीलंड) - विरुद्ध इंग्लंड (लंडन, 2021)
A maiden double century in Tests for Ryan Rickelton as the Proteas pile on the runs in Cape Town 💥#WTC25 | 📝 #SAvPAK: https://t.co/AUvsQcdxg8 pic.twitter.com/pa7lFdJNi4
— ICC (@ICC) January 4, 2025
आफ्रिकेसाठी कसोटीतील चौथं जलद द्विशतक : पाकिस्तानविरुद्धच्या केपटाऊन कसोटी सामन्यात रायन रिकेल्टननं अवघ्या 266 चेंडूत आपलं द्विशतक पूर्ण केलं, जे या फॉरमॅटमधील आफ्रिकन संघाकडून चौथं वेगवान द्विशतक आहे. या यादीत हर्षल गिब्सचं नाव पहिल्या स्थानावर आहे, ज्यानं 2003 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या केपटाऊन कसोटी सामन्यात केवळ 211 चेंडूत द्विशतक पूर्ण केलं होतं.
South Africa continue the run-fest in Cape Town as Ryan Rickelton completes a maiden double hundred 🔥#WTC25 | #SAvPAK:https://t.co/AUvsQcdxg8 pic.twitter.com/TohO4dpLuV
— ICC (@ICC) January 4, 2025
आफ्रिकेसाठी कसोटीत सर्वात कमी चेंडूंमध्ये द्विशतक ठोकणारे खेळाडू :
- हर्शेल गिब्स - 211 चेंडू विरुद्ध पाकिस्तान (केप टाऊन, 2003)
- ग्रॅमी स्मिथ - 238 चेंडू विरुद्ध बांगलादेश (चितगाव, 2008)
- गॅरी कर्स्टन - 251 चेंडू विरुद्ध झिम्बाब्वे (हरारे, 2001)
- रायन रिकेल्टन - 266 चेंडू विरुद्ध पाकिस्तान (केप टाऊन, 2025)
- जॅक कॅलिस - 267 चेंडू विरुद्ध भारत (सेंच्युरियन, 2010)
RYAN RICKELTON IN TEST CRICKET:
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 4, 2025
- First Centurion of 2025.
- First Double Centurion of 2025.
- Ryan Rickelton, The Future of South Africa. ⭐ pic.twitter.com/YNXMczzGJ3
WTC फायनलमध्ये पोहोचणारा दक्षिण आफ्रिका पहिला संघ : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलबद्दल बोलायचं झाल्यास, दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. एक दिवसापूर्वीच दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा पराभव करुन WTC च्या अंतिम फेरीत आपलं स्थान पक्कं केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचं पीसीटी सध्या 66.89 आहे. ऑस्ट्रेलियन संघ अजूनही दुसऱ्या स्थानावर आहे. तर भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे. भारताला WTC च्या अंतिम फेरीत स्थान मिळवायचं असल्याचं या सामन्यासह ऑस्ट्रलिया आणि श्रीलंका कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल.
DOUBLE HUNDRED FOR RYAN RICKELTON..!!!!
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 4, 2025
He smashed a marvelous Double Hundred against Pakistan in the second Test Match - What a Knock by Ryan Rickelton. pic.twitter.com/rRZBkNPTsz
हेही वाचा :