सिडनी Fastest Fifty for India in Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यातील पाचवा कसोटी सामना सिडनी इथं खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात भारतीय संघ 185 धावांत सर्वबाद झाला होता. यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाला 181 धावांवर ऑलआउट केलं. भारताला आता सामन्याच्या दुसऱ्या डावात चांगलं लक्ष्य ठेवण्याची संधी मिळाली. यादरम्यान भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनं शानदार खेळी केली आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवर त्यानं एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे, पण तो एक मोठा विक्रम चुकला.
Half-century off just 29 deliveries 🔥
— BCCI (@BCCI) January 4, 2025
15th Test FIFTY for Rishabh Pant!
This has been an excellent counter-attacking batting display 👏👏
Live - https://t.co/NFmndHLfxu#TeamIndia | #AUSvIND | @RishabhPant17 pic.twitter.com/5fv0E16abh
ऋषभ पंत मोठ्या विक्रमाला मुकला : ऋषभ पंत दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी क्रीझवर आला तेव्हा भारतानं 78 धावांच्या स्कोअरवर 4 विकेट गमावल्या होत्या. येथून पंतनं स्फोटक खेळी करत भारतासाठी एक खास विक्रम केला. या सामन्यात ऋषभ पंतनं 33 चेंडूत 61 धावांची खेळी केली. त्यानं अवघ्या 29 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताकडून हे दुसरं सर्वात जलद अर्धशतक आहे. याआधी पंतनंच 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 28 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. जे भारताकडून सर्वात वेगवान अर्धशतक आहे. या सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक करुन तो स्वतःचाच विक्रम मोडू शकला असता, पण तो हुकला.
Most 50+ scores with 160+ Strike Rate in Test Cricket History:
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 4, 2025
Sir Viv Richards - 2 times.
Rishabh Pant - 2
- ONLY THESE TWO PLAYERS HAVE 2 TIMES IN 148 YEARS OF TEST CRICKET. 🤯 pic.twitter.com/qdiouftu0m
🚨 RISHABH PANT CREATED HISTORY 🚨
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 4, 2025
- RISHABH PANT SCORED FASTEST TEST FIFTY BY VISITING PLAYER IN AUSTRALIA. 🤯 pic.twitter.com/c9M3hrTOBa
भारतासाठी कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक :
- 28 चेंडू - ऋषभ पंत
- 29 चेंडू - ऋषभ पंत*
- 30 चेंडू - कपिल देव
- 31 चेंडू - शार्दुल ठाकूर
- 31 चेंडू - यशस्वी जैस्वाल
RISHABH PANT IS A BOX OFFICE...!!!!
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 4, 2025
- THE ABSOLUTE FREAK. 🥶 pic.twitter.com/cQ7PVO2O1u
33 चेंडूत सर्वात वेगवान खेळी : पंतनं 61 धावांच्या खेळीत एकूण 6 चौकार आणि 4 षटकार मारले. ऑस्ट्रेलियन भूमीवर पाहुण्या फलंदाजानं 33 चेंडूत केलेली ही सर्वात वेगवान खेळी आहे. पंतनं या डावात तब्बल 184.85 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली आहे. याआधी इंग्लंडच्या जॉन ब्राउन (मेलबर्न 1895) आणि वेस्ट इंडिजच्या रॉय फ्रेडरिक्स (पर्थ 1975) यांनी 33 चेंडूत सर्वात वेगवान खेळी खेळली होती. पंतनं 50 वर्षांनंतर हा विक्रम मोडला आहे.
Fastest Test Fifty by Visiting player in Australia Soil:
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 4, 2025
Rishabh Pant - 29 balls in 2025*.
Roy Federicks - 33 balls in 1975. pic.twitter.com/UcutWmuGJF
हेही वाचा :