महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कोहलीच्या 'या विराट' विक्रमाची सूर्यानं त्याच्यापेक्षा निम्मे सामने खेळून केली बरोबरी - Player of The Match Awards - PLAYER OF THE MATCH AWARDS

Most Player of The Match Awards in T20Is : सूर्यकुमार यादवनं 64 टी 20 आंतरराष्ट्रीय 15 वेळा प्लेअर ऑफ ऑफ द मॅच (सामनावीर) चा पुरस्कार जिंकला आहे. टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक खेळाडूचा पुरस्कार जिंकण्यात त्याने विराट कोहलीची बरोबरी केली.

Most Player of The Match Awards in T20Is
विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव (Etv Bharat Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 21, 2024, 10:50 PM IST

नवी दिल्ली Most Player of The Match Awards in T20Is :अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या टी 20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं सुपर-8 फेरीतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघ सुपर-8 च्या गट-1 मध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. भारताकडून सूर्यकुमार यादवनं 28 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीनं 53 धावांची खेळी केली. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 189.29 होता. उर्वरित भारतीय फलंदाज धावा काढण्यासाठी धडपडताना दिसत असताना, सूर्यानं आपले शॉट्स सहज खेळले आणि अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला केला. त्यानं धावा करतच भारताची धावसंख्या 181 पर्यंत पोहोचवली. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 20 षटकांत 134 धावांवर गारद झाला. सूर्यकुमारला त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.

विराटच्या विक्रमाची सूर्याकडून बरोबरी : सूर्यकुमारचा हा 64 वा टी 20 आंतरराष्ट्रीय सामना होता आणि इतक्या सामन्यांमध्ये त्यानं 15 वेळा मॅन ऑफ द मॅच (सामनावीर) चा पुरस्कार जिंकला आहे. टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक सामनावीर खेळाडूचा पुरस्कार जिंकण्यात त्यानं विराट कोहलीची बरोबरी केली आहे. विराटही 15 वेळा सामनावीर ठरला आहे. मात्र, यासाठी विराटला 121 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळावे लागले तर सूर्यकुमारनं त्याच्यापेक्षा जवळपास निम्मे सामने खेळून त्याची बरोबरी केली आहे.

विराटची निराशाजनक कामगिरी : 2022 च्या टी 20 विश्वचषकात विराट टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अखेरचा सामनावीर खेळाडू ठरला होता. त्याच्या 6 नोव्हेंबर 2022 रोजी बांगलादेश विरुद्धच्या टी 20 विश्वचषक सामन्यात नाबाद 64 धावांच्या खेळीसाठी विराटला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं. यानंतर विराटनं आठ सामने खेळले, पण तो सामनावीर बनू शकला नाही. 2022 च्या टी 20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्यानं इंग्लंडविरुद्ध 50 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्यानं सहा डावांत अर्धशतक झळकावलेलं नाही. विराटच्या नावावर 121 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 4066 धावा आहेत. यात एक शतक आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे.

टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवलेले खेळाडू :

  • सूर्यकुमार यादव (भारत), 64 सामने, 15 सामनावीर पुरस्कार
  • विराट कोहली (भारत), 121 सामने, 15 सामनावीर पुरस्कार
  • वीरनदीप सिंग (मलेशिया), 78 सामने, 14 सामनावीर पुरस्कार
  • सिकंदर रझा (झिम्बॉब्वे), 86 सामने, 14 सामनावीर पुरस्कार
  • मोहम्मद नबी (अफगाणिस्तान), 126 सामने, 14 सामनावीर पुरस्कार

हेही वाचा :

  1. पॅट कमिन्ससह 'या' सात गोलंदाजांनी केली टी 20 विश्वचषकात हॅट्ट्रिक; कोणी कधी केला हा पराक्रम? - T20 World Cup Hat Tricks
  2. भारतात झालेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकासाठी अपात्र झालेल्या वेस्ट इंडिजनं 49 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी रचला होता इतिहास - ODI Cricket World Cup 1975
  3. बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम; ऑस्ट्रेलियानं 28 धावांनी जिंकला सामना, कमिन्सनं घेतली हॅट्ट्रिक ! - T20 World Cup 2024

ABOUT THE AUTHOR

...view details