राजकोट Highest ODI Team Total : भारत आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघ दुसऱ्या वनडे सामन्यात आमनेसामने आहेत. या सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार स्मृती मंधानानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी करत आयर्लंडसमोर 370 धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून स्मृती मानधना, हरलीन देओल आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी शानदार फलंदाजी केली.
Innings Break!#TeamIndia post a mammoth total of 370/5 👏
— BCCI Women (@BCCIWomen) January 12, 2025
Over to our bowlers 👊
Updates ▶️ https://t.co/zjr6BQyBQI#INDvIRE | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/pgf3JBNLRY
कर्णधार स्मृती मानधनानं झळकावलं दमदार अर्धशतक : भारताकडून कर्णधार स्मृती मानधना आणि प्रीतिका रावल सलामीला आल्या. या दोन्ही खेळाडूंनी संघासाठी 156 धावांची भागीदारी केली आणि भारतासाठी मोठ्या धावसंख्येचा मजबूत पाया रचला. मंधानानं 73 आणि रावलने 67 धावा केल्या. यानंतर हरलीन देओलनंही अर्धशतक झळकावलं. तर चौथ्या क्रमांकावर आलेल्या जेमिमा रॉड्रिग्जनं एक दमदार शतक झळकावलं. जेमिमानं फक्त 91 चेंडूत 12 चौकारांसह 102 धावा केल्या. या खेळाडूंमुळंच भारतीय महिला संघाला 370 धावांचा मोठा स्कोअर करण्यात यश आलं.
Innings Break!#TeamIndia post a mammoth total of 370/5 👏
— BCCI Women (@BCCIWomen) January 12, 2025
Over to our bowlers 👊
Updates ▶️ https://t.co/zjr6BQyBQI#INDvIRE | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/pgf3JBNLRY
भारतीय महिला संघाची वनडेमध्ये सर्वोत्तम धावसंख्या : 370 धावा ही भारतीय महिला संघाची वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी 2017 मध्ये भारतानं आयर्लंडविरुद्ध वनडे सामन्यात 358 धावा केल्या होत्या. त्याच वेळी, 2024 मध्ये भारतानं वेस्ट इंडिजविरुद्ध एका वनडे सामन्यात 358 धावा केल्या होत्या. ज्या त्यांच्या वनडे सामन्यातील सर्वोत्तम धावा होत्या. पण स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या दमदार खेळीमुळं भारतानं आता हा विक्रम खूप मागे टाकला आहे.
Maiden ODI Century in 📸📸
— BCCI Women (@BCCIWomen) January 12, 2025
A splenid knock that from Jemimah Rodrigues 👏👏
Updates ▶️ https://t.co/zjr6BQy41a#TeamIndia | #INDvIRE | @IDFCFirstBank | @JemiRodrigues pic.twitter.com/03hWTMWb8t
वनडे क्रिकेटमध्ये भारतीय महिलांनी केलेल्या सर्वाधिक धावा :
- आयर्लंड विरुद्ध - 370 धावा
- आयर्लंड विरुद्ध - 358 धावा
- वेस्ट इंडिज विरुद्ध - 358 धावा
- इंग्लंड विरुद्ध - 333 धावा
- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध - 325 धावा
A maiden ODI ton from Jemimah Rodrigues guides India to a commanding total in Rajkot 🙌#INDvIRE 📝: https://t.co/OLz9Ajzamp pic.twitter.com/1L8MADygE7
— ICC (@ICC) January 12, 2025
जेमिमानं झळकावलं वनडे कारकिर्दीतील पहिलं शतक : जेमिमा रॉड्रिग्जनं 2018 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आता तिनं तिच्या वनडे कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं आहे. तिनं आतापर्यंत टीम इंडियासाठी 41 वनडे सामने खेळले आहेत, ज्यात तिनं 1089 धावा केल्या आहेत. यात तिनं 6 अर्धशतकंही झळकावली आहेत.
हेही वाचा :