डरबन Cricketers Arrested for Corruption : सध्या डरबनमध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका क्रिकेट संघ यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीत असून विजयापासून अवघ्या 5 विकेट दूर आहे. एकीकडे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटसाठी ही मोठी, चांगली आणि अभिमानाची बातमी आहे, त्याचवेळी एक लाजिरवाणी बातमीही समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी जवळपास 100 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या माजी अनुभवी खेळाडूला मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गुन्हेगारी तपास विभागानं शुक्रवारी 29 नोव्हेंबर रोजी माजी वेगवान गोलंदाज लोनवाहो त्सोत्सोबेला अटक केली. सोत्सोबेशिवाय आणखी दोन माजी खेळाडूंनाही अटक करण्यात आली आहे.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं घातली होती बंदी :ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, लोनवाबो त्सोत्सोबे, थामी त्सोलेकिले आणि इथी मभालती हे त्या सात क्रिकेटपटूंपैकी आहेत, ज्यांना क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं 2016 आणि 2017 मध्ये T20 टूर्नामेंट दरम्यान मॅच फिक्सिंगसाठी बंदी घातली होती. त्याची स्ट्रिंग 2015-16 रॅम स्लॅम चॅलेंज स्पर्धेशी जोडलेली आहे. 7 खेळाडूंपैकी गुलाम बोदी यापूर्वीच तुरुंगात गेला आहे. तर जीन सिम्स आणि पुमी मतशिक्वे यांना दोषी ठरवल्यानंतर निलंबित शिक्षा सुनावण्यात आली. ज्या तीन खेळाडूंना नुकतीच अटक करण्यात आली आहे. त्यांची सुनावणी फेब्रुवारी 2025 पर्यंत पुढं ढकलण्यात आली आहे. तर अल्विरो पीटरसनबद्दल कोणतीही माहिती नाही.
निवेदनात काय म्हटलं : डीपीसीआयचे राष्ट्रीय प्रमुख लेफ्टनंट जनरल गॉडफ्रे लेबेया यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, भ्रष्टाचारामुळं खेळाची अखंडता कमी होते आणि हॉक्स समाजाच्या सर्व क्षेत्रात निष्पक्षता आणि व्यावसायिकतेच्या मूल्यांसाठी वचनबद्ध आहेत. या संकटाचा सामना करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आम्ही क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे आभार मानतो.