पर्ल SA vs PAK 1st ODI Live Streaming :पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु होत आहे. यातील पहिला सामना आज 17 डिसेंबर (मंगळवार) रोजी बोलंड पार्क, पर्ल इथं खेळवला जाईल. दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 2-0 असा आरामात विजय मिळवला. यजमानांनी सेंच्युरियन T20I मध्ये पाहुण्यांना सात गडी राखून पराभूत करण्यापूर्वी सलामीचा T20 11 धावांनी जिंकला होता. तर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा T20 सामना पावसामुळं रद्द झाला.
यजमानांनी निवडला मजबूत संघ : वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेनं वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या पुनरागमनासह एक मजबूत संघ निवडला आहे. कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्ध ICC वनडे विश्वचषक 2023 च्या उपांत्य सामन्यादरम्यान त्याच्या देशासाठी शेवटचा वनडे सामना खेळला होता. पाहुण्यांसाठी, वनडे संघाचा नवनियुक्त कर्णधार मोहम्मद रिझवान संघाचे नेतृत्व करत राहील. पाकिस्तानच्या सुफियान मुकीमनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी पहिला वनडे कॉल-अप मिळवला आहे. या संघात बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ आणि सॅम अयुब या स्टार क्रिकेटर्सचा समावेश आहे.
तीन वर्षांपूर्वी मालिका विजय : यापुर्वी पाकिस्ताननं 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. यात पाहुण्या पाकिस्ताननं 2-1 नं मालिका जिंकली होती. तर त्यापुर्वी म्हणजेच जानेवारी 2019 मध्ये शेवटच्या वेळी दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानविरुद्ध मालिका विजय मिळवला होता.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय :पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका वनडे फॉरमॅटमध्ये 83 वेळा आमनेसामने आले आहेत. या 83 वनडे सामन्यांपैकी 30 पाकिस्ताननं जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेनं 52 वेळा विजय मिळवला आहे. एक सामना निकालाविना संपला.
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला वनडे 2024 कधी आणि कुठं खेळला जाईल?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान पहिला वनडे सामना 17 डिसेंबर (मंगळवार) रोजी संध्याकाळी 5:30 वाजता बोलंड पार्क, पर्ल इथं सुरु होईल, याची नाणेफेक संध्याकाळी 05:00 वाजता होईल. .