डरबन Sanju Samson Creats History : भारतीय T20 क्रिकेट संघाचा सलामीवीर संजू सॅमसनच्या सलग दुसऱ्या शतकाच्या जोरावर भारतीय संघानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दमदार सुरुवात केली. भारतानं डरबन इथं खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव करत चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
संजू सॅमसनच्या विक्रमी शतकानं रातोरात बनलं नवं 'रेकॉर्ड बुक'; 18 वर्षाच्या भारतीय T20 क्रिकेटच्या इतिहासात 'हे' कोणालाच जमलं नाही - SANJU SAMSON CREATS HISTORY
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात संजू सॅमसननं शानदार शतक झळकावलं. संजूनं अवघ्या 50 चेंडूत 107 धावांची खेळी केली, ज्यात त्यानं 10 षटकार मारले.
Published : Nov 9, 2024, 9:41 AM IST
भारताचा सहज विजय : या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या शानदार शतकाच्या जोरावर भारतानं 20 षटकांत 8 गडी गमावून 202 धावा केल्या. प्रत्युत्तरात चक्रवर्ती (तीन विकेट) आणि बिश्नोई (तीन विकेट) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ 17.5 षटकांत 141 धावांवर गारद झाला. अशा प्रकारे भारतानं T20I क्रिकेटमध्ये सलग 11वा विजय नोंदवला. 107 धावांच्या तुफानी खेळीसाठी संजू सॅमसनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. संजूनं 50 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीनं 107 धावांची खेळी केली आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
- सलग दोन T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतकं ठोकणारा संजू सॅमसन हा जगातील चौथा फलंदाज ठरला. याआधी हा मोठा पराक्रम फक्त फ्रान्सचा गुस्ताव मॅककीन, दक्षिण आफ्रिकेचा रिले रुसो रोसो आणि इंग्लंडचा फिल सॉल्ट यांनी केला होता.
- संजू सॅमसन हा यष्टीरक्षक म्हणून दोन किंवा त्याहून अधिक T20I शतकं करणारा जगातील दुसरा फलंदाज आहे. यापूर्वी हा विक्रम फक्त सर्बियाच्या लेस्ली एड्रियन डनबरच्या नावावर होता.
- दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 सामन्यात सर्वाधिक धावा करणारा संजू सॅमसन हा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता, ज्यानं 2015 साली धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर 106 धावांची इनिंग खेळली होती.
- संजू सॅमसननं दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर T20 सामन्यांमध्ये भारतीयाकडून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम केला. यापूर्वी हा विक्रम सूर्यकुमार यादवच्या नावावर होता, ज्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर 100 धावांची इनिंग खेळली होती.
- संजू सॅमसन रॉबिन उथप्पासह T20 मध्ये 7000 धावा करणारा संयुक्त सातवा वेगवान भारतीय ठरला. त्यानं आपल्या 269व्या डावात ही कामगिरी केली.
- संजू सॅमसननं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मध्ये चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या केली. या प्रकरणात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम बाबर आझम (122) च्या नावावर आहे. त्यानंतर जॉन्सन चार्ल्स (118) आणि ख्रिस गेल (117) यांचा क्रमांक लागतो.
- संजू सॅमसन हा सलग दोन T20I डावात भारतासाठी सर्वाधिक 218 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्यानं ऋतुराज गायकवाडचा विक्रम मोडला. सलग 2 डावात 181 धावा करण्याचा विक्रम गायकवाडच्या नावावर होता.
हेही वाचा :