महाराष्ट्र

maharashtra

ऋषभ पंतच्या दिल्लीत मोठा फेरबदल; आगामी आयपीएलपुर्वी दिग्गजानं तोडलं संघासोबत नात - Ricky Ponting

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 13, 2024, 10:02 PM IST

Ricky Ponting : रिकी पाँटिंगनं गेल्या 7 आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं. 2019 च्या हंगामात पाँटिंग दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाला.

Ricky Ponting
ऋषभ पंतच्या दिल्लीत मोठा फेरबदल (ETV Bharat File Photo)

नवी दिल्ली Ricky Ponting : दिग्गज ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंग आता इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) चे मुख्य प्रशिक्षक असणार नाही. रिकी पाँटिंगनं दिल्ली कॅपिटल्ससह आपला प्रवास संपवला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या सोशल मीडिया हँडलवरुन याची अधिकृतपणे माहिती देण्यात आली आहे. त्याच्या योगदानाबद्दल दिल्ली कॅपिटल्सच्या वतीनं पाँटिंगचे आभार मानले आहेत.

पाँटिंग आणि दिल्ली कॅपिटल्सचं 7 वर्षांचं नातं तोडलं : दिल्ली कॅपिटल्सनं आपल्या सोशल मीडियावर लिहिलं, "प्रिय रिकी, तुम्ही आमचे मुख्य प्रशिक्षकपद सोडत असल्यानं आम्ही ते शब्दात व्यक्त करु शकत नाही. तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळी सांगितलेल्या चार गोष्टी काळजी, वचनबद्धता, वृत्ती आणि प्रयत्न आमच्या सात हंगामाच्या आठवणी ताज्या करतात. प्रत्येक प्रशिक्षण सत्रात तुम्ही पहिले आणि निघणारे शेवटचे होता. जेव्हा तुम्ही धोरणात्मक कालबाह्यतेदरम्यान डगआउटमधून बाहेर पडता. प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद प्रशिक्षक."

2020 मध्ये गाठली अंतिम फेरी :रिकी पाँटिंगनं गेल्या सात आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. 2019 च्या हंगामात पाँटिंग दिल्ली कॅपिटल्सशी जोडला गेला. 2021 मध्ये, त्याच्या प्रशिक्षणाखाली दिल्ली कॅपिटल्सनं प्रथमच अंतिम फेरी गाठली. मात्र, त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. पाँटिंगच्या प्रशिक्षणाखाली, दिल्ली संघ 2019 च्या हंगामात शेवटच्या स्थानावर राहिला. परंतु नंतर 2020 आणि 2021 मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरला. मात्र, दिल्ली कॅपिटल्स गेल्या तीन हंगामात प्लेऑफसाठी पात्र ठरु शकला नाही. आयपीएल 2024 मध्ये पाँटिंगच्या कोचिंग आणि ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स सहाव्या स्थानावर होती.

मुंबई इंडियन्सला बनवलं हेतं चॅम्पियन : रिकी पाँटिंगला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम कर्णधार मानलं जातं. ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार पाँटिंग आयपीएलमध्ये मुंबईकडून क्रिकेट खेळला. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पाँटिंग आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून क्रिकेट खेळला. यानंतर त्यानं 2014 ते 2016 या काळात मुंबई इंडियन्स संघाचं प्रशिक्षकपदही भूषवलं होतं. याच काळात पाँटिंगनं 2015 मध्ये मुंबई इंडियन्स संघाला चॅम्पियन बनवलं होतं.

हेही वाचा :

  1. ऋषभ पंत आयपीएलमध्ये खेळणार की नाही? प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी थेटच सांगितलं
  2. Ricky Ponting on KL Rahul : मी बीजीटीमध्ये कोणत्याही फलंदाजाचा फॉर्म पाहणार नाही, कोहली परत येईल : पाँटिंग

ABOUT THE AUTHOR

...view details