महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

राष्ट्रीय क्रीडा दिन 2024 : काय आहे इतिहास, का साजरा केला जातो हा दिवस? - National Sports Day 2024

National Sports Day 2024 : देशातील खेळांच्या परंपरेचे स्मरण करण्यासाठी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिवस मेजर ध्यानचंद आणि इतर भारतीय क्रीडा दिग्गजांचं स्मरण केलं जातं.

National Sports Day 2024
राष्ट्रीय क्रीडा दिन (ETV Bharat Graphics)

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 29, 2024, 12:05 AM IST

Updated : Aug 29, 2024, 8:10 AM IST

नवी दिल्ली National Sports Day 2024 : देशातील खेळांची परंपरा जपण्यासाठी आणि भारतीय क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठितांना आदरांजली वाहण्यासाठी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन देशाभरात साजरा केला जातो. विशेष म्हणजे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना ही श्रद्धांजली आहे. आज भारतीय हॉकी दिग्गजाची 113वी जयंती आहे.

मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन : मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी अहमदाबादमधील राजपूत कुटुंबात झाला. त्यांचे वडील समेश्वर सिंग यांच्याप्रमाणेच ते भारतीय सैन्यात भरती झाले आणि त्यांना तेथील खेळाची आवड निर्माण झाली. भारतीय हॉकीच्या महान खेळाडूचं मूळ नाव ध्यानसिंग होते, परंतु ते रात्रीच्या प्रकाशातच सराव करत असे आणि त्यामुळं त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचं नाव ध्यानचंद ठेवलं.

कशी होती कामगिरी :आपल्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी 400 गोल केले आणि तीन ऑलिम्पिक पदकं जिंकली. त्यांच्या स्मरणार्थ दिल्लीतील राष्ट्रीय हॉकी स्टेडियमचं 2002 मध्ये मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम असं नामकरण करण्यात आलं. भारतीय हॉकीमधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. त्यांनी आपल्या शौर्यानं फक्त खेळातच योगदान दिलं नाही तर नंतरच्या काळात प्रशिक्षक म्हणूनही काम केलं. पटियाला येथील राष्ट्रीय क्रीडा संस्थेत ते मुख्य प्रशिक्षक होते. तसंच, मेजर ध्यान खेलरत्न पुरस्काराद्वारे भारतीय हॉकी दिग्गजाच्या नावानं दरवर्षी क्रिडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्यांना सन्मानित केलं जातं.

राष्ट्रीय क्रीडा दिनाची थीम काय : राष्ट्रीय क्रीडा दिन 2024 ची थीम ‘स्पोर्ट फॉर द प्रमोशन: शांततापूर्ण आणि समावेशी समाज’ अशी आहे. ही थीम व्यक्तींना एकत्र आणण्यासाठी आणि सामाजिक बंध मजबूत करण्याचं साधन म्हणून खेळाचं महत्त्व अधोरेखित करतं. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि कामगार मंत्री, मनसुख मांडाविय यांनी नागरिकांना किमान एक तास मैदानी खेळांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. तसंच, चार वर्षांपूर्वी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या फिट इंडिया चळवळीत सहभागी होण्याचं आवाहनही मंत्र्यांनी नागरिकांना केलं.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया चळवळीची सुरुवात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त इंदिरा गांधी स्टेडियमवर फिट इंडिया चळवळ सुरु केली. लोकांना निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रेरित करणं हा या चळवळीचा उद्देश आहे. चळवळ व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनात शारीरिक क्रियाकलाप आणि खेळ समाविष्ट करण्यास प्रोत्साहित करते. चळवळ लोकांना रोग टाळण्यासाठी जीवनशैलीत लहान बदल करण्यास मदत करते. विविध संस्था विशेष फिटनेस कार्यक्रम आणि क्रीडा कार्यक्रम आयोजित करुन हा दिवस साजरा करतात.

हेही वाचा :

  1. ICC क्रमवारीत मोठे बदल... विराट कोहली, यशस्वी जैस्वालचा न खेळताच मोठा फायदा तर बाबर आझमचं खेळूनही नुकसान - ICC Rankings 2024
Last Updated : Aug 29, 2024, 8:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details