महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रोहित शर्माला संघात घेण्यासाठी RCB खर्च करणार मोठी रक्कम? दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य - Rohit Sharma in RCB - ROHIT SHARMA IN RCB

Rohit Sharma in RCB : IPL 2025 साठी, माजी भारतीय क्रिकेटपटूनं RCB ला कोणत्याही परिस्थितीत रोहित शर्माला संघात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला आहे.

Rohit Sharma in RCB
Rohit Sharma in RCB (ANI Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 1, 2024, 7:45 PM IST

मुंबई Rohit Sharma in RCB : IPL 2025 ची तयारी आणि त्याबाबतच्या सगळीकडे सुरु आहेत, कारण यावेळी मेगा लिलाव होणार आहे आणि बहुतेक संघ पूर्णपणे बदलले जाणार आहेत. BCCI नं IPL 2025 साठी नवीन नियम देखील जाहीर केले आहेत, ज्यात IPL पगार आणि परदेशी खेळाडूंसाठी बोली लावण्याबाबत नवीन नियम समाविष्ट आहेत.

काय म्हणाला कैफ :आता माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ला आगामी मेगा लिलावात रोहित शर्माला संघात घेण्याचं सुचवलं आहे. तो म्हणाला की, 'जर त्याची सध्याची फ्रेंचायझी मुंबई इंडियन्स (MI) त्याला सोडत असेल तर रोहितनंही त्याचा विचार केला पाहिजे.'

रोहितला कर्णधार म्हणून खेळण्याचा सल्ला : रोहित हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. MI नं त्याला IPL 2024 मध्ये कर्णधारपदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला. मुंबईनं रोहितला कर्णधारपदावरुन हटवलं आणि पांड्याला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केलं, तेव्हा हार्दिकला चाहत्यांच्या टीकेचा आणि ट्रोलचा सामना करावा लागला. कैफनं रोहितला IPL च्या पुढच्या हंगामात कर्णधार म्हणून खेळण्याचा सल्ला दिला आहे.

RCB नं काहीही करुन रोहितला घ्यावं : स्टारस्पोर्ट्सनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कैफ उघडपणे म्हणाला, जसा हार्दिक पांड्या मागच्या वेळी गुजरातमधून मुंबईसाठी आला होता, त्यामुळं रोहित शर्माही जाऊ शकतो आणि त्यानं जावं. रोहित शर्माला उरलेली 2-3 वर्षे खेळायची आहेत, तो एका कर्णधाराच्या भूमिकेत असावा आणि RCb नं ही संधी साधली पाहिजे. त्यांना जिथं संधी मिळेल, त्यांना काहीही करायचं असलं तरी त्यांनी रोहितला कर्णधार बनवलं पाहिजे, असं कैफ म्हणाला.

हेही वाचा :

  1. ...तर खेळाडूवर लागणार 2 वर्ष बंदी; BCCI नं घेतला सर्वात मोठा निर्णय - Player Ban in IPL
  2. IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी BCCI खेळाडूंवर मेहरबान; जय शाहांच्या 'या' घोषणेनं क्रिकेटर्स मालामाल - IPL 2025
  3. IPL 2025 मध्ये सामन्यांची संख्या वाढणार? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - IPL 2025

ABOUT THE AUTHOR

...view details