ETV Bharat / sports

Champions Trophy च्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाच्या 7 खेळाडूंचं 'पदार्पण', रोहितचा मोठा निर्णय - BAN VS IND 2ND MATCH

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे.

BAN vs IND 2nd Match
टीम इंडिया (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Feb 20, 2025, 3:51 PM IST

दुबई BAN vs IND 2nd Match : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा सामना भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघांमध्ये दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत भारतीय संघ या सामन्यात प्रथम गोलंदाजी करत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गेल्या दोन आवृत्त्या टीम इंडियासाठी उत्तम राहिल्या आहेत आणि यावेळीही त्यांना चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न असेल. टीम इंडियाच्या 7 खेळाडूंसाठी हा सामना खूप खास आहे. खरंतर, या सर्व खेळाडूंचं खास पदार्पण झालं आहे.

टीम इंडियाच्या 7 खेळाडूंचं 'पदार्पण' : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जवळजवळ 8 वर्षांनी खेळली जात आहे. म्हणजेच ही स्पर्धा शेवटच्या वेळी 2017 मध्ये खेळली गेली होती. अशा परिस्थितीत, टीम इंडियाच्या सध्याच्या संघात असे खूप कमी खेळाडू आहेत जे यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळले आहेत. शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि हर्षित राणा हे सर्व खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पदार्पण करणारे आहेत. याशिवाय, प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट असलेले रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा हेच खेळाडू या स्पर्धेत यापूर्वी खेळले आहेत.

सलग अकव्यांदा हरले टॉस : भारतीय कर्णधार रोहित शर्मा या सामन्यातही नाणेफेक जिंकू शकला नाही आणि ही पहिलीच वेळ नाही. 2023 च्या वनडे विश्वचषकापासून टीम इंडियानं सलग 11 वेळा टॉस गमावले आहेत. जो एक विक्रम देखील आहे. याआधी, नेदरलँड्स संघानं मार्च 2011 ते ऑगस्ट 2013 दरम्यान 11 वेळा नाणेफेक गमावली होती. तथापि, नाणेफेक गमावल्यानंतर रोहित म्हणाला, 'मी प्रथम क्षेत्ररक्षण केलं असतं. आम्ही काही वर्षांपूर्वी इथं खेळलो होतो. त्यामुळं आम्हाला वाटले की चेंडू लाईटखाली चांगला येतो. सगळं छान दिसत आहेत. सर्वजण खेळण्यासाठी तंदुरुस्त आणि ठीक आहेत. आशा आहे की आपल्याला चांगली सुरुवात होईल. मागे वळून पाहू नका, या स्पर्धेत प्रत्येक सामना खूप महत्त्वाचा बनतो.'

रोहित शर्माचे मोठे निर्णय : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक गमावली आणि त्यांना प्रथम गोलंदाजीचं आमंत्रण देण्यात आलं. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात रोहित शर्मानं एक आश्चर्यकारक निर्णय घेतला. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनसाठी रोहितनं मोठे निर्णय घेतले. रोहितनं वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला वगळलं. त्याच्या जागी हर्षित राणाला संधी मिळाली आहे. यासोबतच वरुण चक्रवर्तीचाही संघात समावेश नाही. त्याच्यापेक्षा रवींद्र जडेजाला प्राधान्य देण्यात आलं. तर वॉशिंग्टन सुंदर आणि ऋषभ पंत हे देखील संघात सामील झाले नाहीत.

हेही वाचा :

  1. 12 वर्षांनंतर 'मिनी वर्ल्ड कप' जिंकण्यासाठी टीम इंडिया शेजाऱ्यांविरुद्ध उतरणार मैदानात; BAN vs IND मॅच 'इंथ' पाहा लाईव्ह
  2. BAN vs IND 2nd Match Live: अवघ्या 35 धावांवर शेजाऱ्यांचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये; 'अक्षर'ची हॅटट्रिक हुकली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.