महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Ranji Trophy 2024 Final : अय्यर-रहाणे फ्लॉप; पहिल्या डावात मुंबईच्या 224 धावा

Ranji Trophy Final : रणजी ट्रॉफी २०२४ चा अंतिम सामना मुंबई आणि विदर्भ यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्याच दिवशी विदर्भाच्या गोलंदाजांसमोर मुंबईचे फलंदाज फ्लॉप ठरले. पहिल्या दिवशी पहिल्या डावात मुंबईचे ७ फलंदाज अवघ्या १७२ धावांत गारद झाले होते.

Ranji Trophy Final: चांगल्या सुरुवातीनंतर 'मुंबई' अडखळली 18 धावांत गमावल्या 4 विकेट; अय्यरकडून पुन्हा निराशा
Ranji Trophy Final: चांगल्या सुरुवातीनंतर 'मुंबई' अडखळली 18 धावांत गमावल्या 4 विकेट; अय्यरकडून पुन्हा निराशा

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 7:23 AM IST

Updated : Mar 10, 2024, 5:14 PM IST

मुंबई Ranji Trophy Final : रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना हा महाराष्ट्रातीलच दोन संघांमध्ये होत आहे. 53 वर्षांनी एकाच राज्यातील दोन संघ रणजीच्या अंतिम सामन्यात पोहोचले आहेत. तब्बल 48व्यांदा रणजीचा अंतिम सामना खेळणाऱ्या मुंबईचा सामना विदर्भाशी आहे. अजिंक्य रहाणेसारख्या कुशल कर्णधाराच्या नेतृत्वाखालील मुंबईची नजर 42व्या विजेतेपदाकडे असेल. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतानं ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकलीय. मात्र तो सध्या राष्ट्रीय संघाबाहेर आहे. रहाणेची देशांतर्गत स्तरावरही चांगली कामगिरी दिसून नाही. पण यामुळं त्याच्या कर्णधार पदाच्या कौशल्याला कमी लेखता येणार नाही. रहाणेनं रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात आतापर्यंत 13.4 च्या सरासरीनं केवळ 134 धावा केल्या आहेत.

चांगल्या सुरुवातीनंतर मुंबई संघ गडगडला : विजेतेपदाच्या लढतीत विदर्भानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीचं आमंत्रण मिळाल्यावर पृथ्वी शॉ आणि भूपेन लालवानी यांनी मुंबईला झंझावाती सुरुवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. मुंबईला पहिला धक्का लालवानीच्या रुपानं बसला तो 37 धावांवर यश ठाकूरचा बळी ठरला. त्याच्यापाठोपाठ पृथ्वी शॉही 46 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला हर्ष दुबेनं बोल्ड केलं. मुशीर खानही फार काही करु शकला नाही आणि वैयक्तिक 6 धावांवर हर्ष दुबेचा बळी ठरला. मुंबईला डावाचा चौथा धक्का श्रेयस अय्यरच्या रुपानं बसला तो 7 धावांवर बाद झाला. रणजीमध्ये अय्यरची खराब कामगिरी कायम आहे. लंच ब्रेकपर्यंत मुंबईचा स्कोर 109/4 होता. मात्र दुसऱ्या सत्रातही ठराविक अंतरानं विकेट पडतच राहिल्या. मात्र एका बाजूनं शार्दुल ठाकुरनं खेळपट्टीवर तळ ठोकून उभा आहे. तो आयपीएल स्टाईलमध्ये फलंदाजी करत असून अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. सध्या मुंबईच्या 8 विकेट पडल्या आहेत.

मुंबईची तगडी फलंदाजी : मुंबईला दोन वेळच्या चॅम्पियन विदर्भाकडून कठीण आव्हानाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या संघानं स्पर्धेच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर चांगली कामगिरी केलीय. कसोटी क्रिकेटमध्ये 150 हून अधिक बळी घेणारा उमेश यादव नव्या चेंडूनं मुंबईच्या फलंदाजांना आव्हान देऊ शकतो. या हंगामात मुंबईच्या फलंदाजांना प्रतिस्पर्ध्यांप्रमाणे मोठी धावसंख्या करता आली नाही. पण त्यांच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी केलीय. यष्टिरक्षक फलंदाज हार्दिक तमोरनं 252 धावांचं, तनुष कोटियननं 481 धावांचं, शम्स मुलानीनं 290 धावांचं आणि तुषार देशपांडेनं 168 धावांचं योगदान दिलंय. शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर यांनीही मुंबईसाठी महत्त्वाची खेळी खेळलीय. तसंच भारतीय अंडर-19 संघाचा फलंदाज मुशीर खान उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. अशा परिस्थितीत मुंबईच्या फलंदाजांवर मात करणं विदर्भाच्या गोलंदाजांना सोपं जाणार नाही.

विदर्भाच्या फलंदाजी सातत्यपूर्ण कामगिरी :विदर्भाचा विचार केला तर त्याच्या संघानं खेळाच्या प्रत्येक विभागात सातत्यानं चांगली कामगिरी केलीय. त्यांच्या फलंदाजांनी मोठ्या खेळी केल्या आहेत. विदर्भाच्या फलंदाजीत करुण नायर (41.06 च्या सरासरीनं 616 धावा), ध्रुव शौरे (36.6 च्या सरासरीनं 549 धावा), अक्षय वाडकर (37.85 च्या सरासरीनं 530 धावा), अथर्व तायडे (44.08 च्या सरासरीनं 529 धावा) यांचा समावेश आहे. तसंच यश राठोड (57 च्या सरासरीने 456 धावा) यांनी चमकदार कामगिरी केलीय. तर आदित्य सरवटे (40 बळी) आणि आदित्य ठाकरे (33 बळी) यांनी गोलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान दिलंय.

अंतिम सामन्यापर्यंतचा दोन्ही संघाचा प्रवास :

मुंबई :

  • बिहार विरुद्ध डाव आणि 51 धावांनी विजय
  • आंध्र प्रदेश विरुद्ध 10 विकेटनं विजय
  • केरळ विरुद्ध 232 धावांनी विजय
  • उत्तर प्रदेश विरुद्ध 2 विकेटनं पराभव
  • बंगाल विरुद्ध डाव आणि 4 धावांनी विजय
  • छत्तीसगड विरुद्ध सामना ड्रॉ (पहिल्या डावातील आघाडीवर मुंबई विजयी)
  • आसाम विरुद्ध डाव आणि 80 धावांनी विजय
  • उपांत्यपूर्व सामन्यात बडोदा विरुद्ध सामना ड्रॉ (पहिल्या डावातील आघाडीवर मुंबई विजयी)
  • उपांत्य सामन्यात तामिळनाडू विरुद्ध डाव आणि 70 धावांनी विजय

विदर्भ :

  • सर्व्हिसेस विरुद्ध 7 विकेटनं विजय
  • माणिपूर विरुद्ध डाव आणि 90 धावांनी विजय
  • सौरष्ट्र विरुद्ध 238 धावांनी पराभव
  • झारखंड विरुद्ध 308 धावांनी विजय
  • राजस्थान विरुद्ध सामना ड्रॉ (पहिल्या डावातील आघाडीवर राजस्थान विजयी)
  • महाराष्ट्र विरुद्ध 10 विकेटनं विजय
  • हरियाणा विरुद्ध 115 धावांनी विजय
  • उपांत्यपूर्व सामन्यात कर्नाटक विरुद्ध 127 धावांनी विजय
  • उपांत्य सामन्यात मध्य प्रदेश विरुद्ध 62 धावांनी विजय

अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ :

  • मुंबई :अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन ललवाणी, अमोघ भटकळ, श्रेयस अय्यर, मुशीर खान, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), प्रसाद पवार (यष्टीरक्षक), तनुष कोटियन, शम्स मुलाणी, अथर्व अंकोलेकर, शार्दुलकर, शार्दुलकर. मोहित अवस्थी, रॉयस्टन डायस, धवल कुलकर्णी.
  • विदर्भ : अक्षय वाडकर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, करुण नायर, यश राठोड, मोहित काळे, हर्ष दुबे, ललित यादव, आदित्य सरवटे (उपकर्णधार), यश ठाकूर, आदित्य ठाकरे, दर्शन नळकांडे, ध्रुव वडकर. (यष्टीरक्षक), अक्षय वाखारे, अमन मोखंडे, उमेश यादव, दानिश मलेवार, मंदार महाले.

हेही वाचा :

  1. पाचव्या कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचे 'तीनतेरा'; भारतीय संघाचा डावानं विजय, 112 वर्ष जुना विक्रम मोडीत
  2. जेम्स अँडरसननं 41व्या वर्षी रचला इतिहास; 'अशी' कामगिरी करणारा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच वेगवान गोलंदाज
Last Updated : Mar 10, 2024, 5:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details