नवी दिल्ली PM Narendra Modi Meets Paris Olympics Players : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भारताची मोहीम 6 पदकांसह संपली आहे. बुधवारी, CAS नं विनेश फोगटचं संयुक्त पदक देण्याचं आवाहन नाकारल्यानं भारतीय संघाच्या आणखी एक पदक मिळविण्याच्या आशा संपुष्टात आल्या. यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडूंची भेट घेतली. सर्व खेळाडूंची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना संबोधितही केलं.
पंतप्रधान मोदींनी पॅरिस ऑलिम्पिक खेळाडूंची घेतली भेट (ETV Bharat) निरज चोप्रा अनुपस्थित : यावेळी पंतप्रधान मोदींनी एक एक करुन सर्व पदक विजेत्या खेळाडूंची भेट घेतली. मात्र रौप्यपदक विजेता नीरज चोप्रा भारतात नसल्यामुळं या बैठकीत सहभागी होऊ शकला नाही. याशिवाय भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधू या बैठकीत सहभागी होऊ शकला नाही. मात्र, यावेळी पीव्ही सिंधूला एकही पदक जिंकता आलेलं नाही. पदकासह सर्वांनी पंतप्रधान मोदींसोबत फोटोही काढले.
मनू भाकरनं दिलं पिस्तूल : यादरम्यान भारतीय नेमबाज मनू भाकर पंतप्रधान मोदींना पिस्तुलाबद्दल सांगताना दिसली. यानंतर तिने मोदींना पिस्तूल भेट दिली. दोघांनीही एकमेकांचं अभिनंदन केलं. तसंच हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत आणि श्रीजेशसोबत पंतप्रधान मोदींनी एक संयुक्त फोटो काढला. भारतीय हॉकी संघानं पंतप्रधानांना हॉकी स्टिकसह सर्व खेळाडूंच्या स्वाक्षरी असलेल्या जर्सीही भेट दिल्या. भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश यानं हॉकीला अलविदा केला असून तो एक उत्कृष्ट गोलरक्षक होता.
भारतानं जिंकली सहा पदकं : यावेळी भारतानं एकूण 6 पदकं जिंकली आहेत. मनू भाकरनं 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. यानंतर तिनं सरबज्योत सिंगसोबत सांघिक स्पर्धेत दुसरं पदक जिंकलं. अमन सेहरावतनं कुस्तीमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकलं, हॉकी संघानंही 52 वर्षांनंतर सलग दोन पदकं जिंकून इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. त्याचबरोबर नीरज चोप्रानं यंदा रौप्यपदक पटकावलं आहे. तर स्वप्नील कुसाळेनं 50 मीटर नेमबाजी प्रकारात कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे.
हेही वाचा :
- उरली सुरली पदकाची आशा संपली, विनेश फोगाटचं अपील सीएएसनं फेटाळलं! - vinesh phogat CAS hearing verdict