पॅरिस Paris Olympics 2024 : कुस्तीपटू विनेश फोगट आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं (IOA) यांनी अपात्रतेच्या निर्णयाविरोधात CAS (कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट) मध्ये अपील केलं आहे. त्यांचा संयुक्तपणे सन्मान करण्यात यावा, अशी विनंती विनेशनं क्रीडा न्यायालयात केली. हीच बाब लक्षात घेता विनेश फोगटच्या अर्जावर ऑलिम्पिक संपण्यापूर्वी निर्णय घेण्यात येईल, असं कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट सांगितलं. विनेश फोगटनं एक पोस्ट करुन निवृत्तीची घोषणा केली आहे.
विनेशच्या अर्जावर कधी येणार निर्णय : CAS नं एका निवेदनात म्हटलं की, 'भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट (अर्जदार) यांनी 7 ऑगस्ट 2024 रोजी युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) नं घेतलेल्या निर्णयाविरुद्ध तदर्थ विभागात अपील दाखल केलं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या फ्रीस्टाइल 50 किलो फायनल (सुवर्णपदक) सामन्यापूर्वी दुसऱ्या वजन चाचणीत अपयशी ठरल्यानं तिला अपात्र ठरवण्यात आलं.
एकत्रितपणे पदक मिळण्याची अपील : विनेश फोगट (याचिकादार) यांनी सुरुवातीला तदर्थ विभागाला निर्णय बाजूला ठेवण्याची आणि अंतिम सामन्यापूर्वी दुसऱ्या वजन प्रक्रियेसह अंतिम फेरीत सहभागी होण्यासाठी तिला पात्र घोषित करण्याची विनंती केली होती. तात्काळ अंतरिम उपायांसाठी विनंती करुनही, CAS एका तासात पात्रतेवर निर्णय घेऊ शकला नाही. यानंतर, याचिकाकर्त्यांनी निर्णय बाजूला ठेवण्यासाठी आणि एकत्रितपणे पदक मिळवं अशी अपील केली.
आता देशाला रौप्यपदकाची आशा : आशियाई आणि राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या फोगटनं ऑलिम्पिक फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनून इतिहास रचला होता. चालू ऑलिम्पिकमध्ये 140 कोटी देशवासीयांना आपल्या कुस्तीतून सुवर्णाची अपेक्षा होती, पण ते होऊ शकलं नाही. यावेळी किमान देशाला रौप्यपदक तरी मिळेल, हीच आता देशवासीयांची आशा आहे.
हेही वाचा :
- अलविदा कुस्ती! "मी हरले, कुस्ती जिंकली"; भावनिक पोस्ट शेयर करत विनेश फोगटनं कुस्तीला ठोकला 'रामराम' - Vinesh Phogat Goodbye To Wrestling
- विनेश फोगटचं 52 किलो होते वजन, रात्रभर प्रयत्न केले, केसंही कापले, पण...; वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितली 'इनसाईड स्टोरी' - Vinesh Phogat Disqualified
- भारताला मोठा धक्का... अंतिम सामन्यात पोहोचलेली कुस्तीपटू विनेश फोगट ऑलिम्पिकसाठी अपात्र, कारण काय? - Paris Olympics 2024