महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कुस्तीपटू अमन सेहरावत उपांत्य फेरीत; पदकापासून फक्त एक विजय दूर - Paris Olympics 2024 - PARIS OLYMPICS 2024

Paris Olympics 2024 : भारताचा स्टार कुस्तीपटू अमन सेहरावतनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या 57 किलो कुस्तीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

Paris Olympics 2024
अमन सेहरावत (ANI Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 8, 2024, 4:39 PM IST

Updated : Aug 8, 2024, 5:08 PM IST

पॅरिस Paris Olympics 2024 :भारताचा स्टार कुस्तीपटू अमन सेहरावतनं गुरुवारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये शानदार कामगिरी केली आहे. अमननं पुरुषांच्या 57 किलो कुस्तीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळं आणखी एका पदक मिळण्याची अपेक्षा केली जात आहे.

विश्वविजेत्याला हरवून अमन उपांत्य फेरीत :भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतनं पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाइलच्या उपांत्यपूर्व फेरीत 2022 चा विश्वविजेता अल्बानियाच्या झेलीमखान अबाकारोव्हचा 12-0 असा पराभव केला. भारताच्या अमन सेहरावतनं उपांत्यपूर्व फेरीत विश्वविजेत्या अबाकारोव्हचा पराभव करुन सर्वांनाच चकित केलंय. आशियाई चॅम्पियनशिप विजेत्या अमन सेहरावतनं दुसऱ्या फेरीच्या पहिल्याच मिनिटात अल्बेनियन विश्वविजेत्या अबाकारोव्हचा पराभव केला. अमननं दुसऱ्या फेरीत 2:04 मिनिटं शिल्लक असताना 9 गुण मिळवले आणि तांत्रिक श्रेष्ठतेच्या आधारे सामना 12-0 असा जिंकला.

तंदुरुस्त चालीनं प्रतिस्पर्ध्याचा केला पराभव : भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतनं या सामन्यात एक 'फिटले मूव्ह' सादर केली, जी कुस्तीमधील एक चाल आहे ज्यामध्ये कुस्तीपटू त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या घोट्याला पकडतो आणि वेगानं फिरतो, ज्यामुळं जगज्जेता अबाकारोव्ह आश्चर्यचकित झाला आणि पराभूत झाला.

पदक मिळवण्यापासून एक विजय दूर : भारताचा स्टार कुस्तीपटू अमन सेहरावतची उपांत्य फेरीची लढत आज रात्री भारतीय वेळेनुसार रात्री 9:45 वाजता होणार आहे. यात त्याचा सामना रिओ ऑलिम्पिक 2016 च्या रौप्यपदक विजेत्या जपानच्या अव्वल मानांकित रे हिगुचीशी होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं पहिलं कुस्ती पदक मिळवण्यापासून अमन आता फक्त एक विजय दूर आहे. भारताच्या 140 कोटी देशवासीयांना आशा आहे की अमन आज सर्वांना आनंदी होण्याची संधी देईल.

हेही वाचा :

  1. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने... कधी होणार 'हायव्होल्टेज' सामना? - India vs Pakistan at Paris Olympics
  2. कुस्तीपटू विनेश फोगटला अजूनही मिळू शकतं 'सिल्वर मेडल'? आज होणार मोठा निर्णय - Paris Olympics 2024
  3. आणखी एक भारतीय कुस्तीपटू वादात, ऑलिम्पिक अर्ध्यावर सोडून परतणार भारतात; जाणून घ्या कारण - Paris Olympics 2024
Last Updated : Aug 8, 2024, 5:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details