महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारतीय महिला टेबल टेनिस संघानं रचला इतिहास; रोमानियाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक - Paris Olympics 2024

Paris Olympics 2024 Table Tennis : भारतीय महिला टेबल टेनिस संघानं पॅरिस ऑलिम्पिकमधील आपल्या मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली आहे. सोमवारी खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यात भारतीय संघानं रोमानियाचा 3-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करत इतिहास रचला आहे.

Table Tennis
श्रीजा अकुला आणि मनिका बत्रा (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 5, 2024, 5:00 PM IST

पॅरिस Paris Olympics 2024 Table Tennis : भारतीय महिला टेबल टेनिस संघानं पॅरिस ऑलिम्पिकमधील आपल्या मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली आहे. दक्षिण पॅरिस एरिना इथं सोमवारी खेळल्या गेलेल्या राऊंड ऑफ 16 च्या रोमांचक सामन्यात भारतीय संघानं रोमानियाचा 3-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

कामथ आणि अकुला यांची शानदार सुरुवात : भारताच्या अर्चना कामथ आणि श्रीजा अकुला यांनी महिलांच्या टेबल टेनिसच्या राऊंड ऑफ 16 च्या पहिल्या सामन्यात अदिना डायकोनू आणि एलिझाबेथ समारा यांचा 11-9, 12-10, 11-7 असा पराभव करुन भारताला चांगली सुरुवात करुन दिली आणि त्यांना 1-0 अशी आघाडी मिळवली.

मनिका बत्रानं केली 2-0 आघाडी : भारतीय टेबल टेनिस स्टार मनिका बत्रानं राऊंड ऑफ 16 च्या टेबल टेनिस सामन्याच्या दुसऱ्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 10व्या स्थानावर असलेल्या रोमानियाच्या बर्नाडेट स्झोक्सवर 11-5, 11-7, 11-7 असा विजय मिळवला आणि भारताला या सामन्यात 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

तिसऱ्या फेरीत श्रीजा अकुलाचा पराभव : भारताची स्टार पॅडलर श्रीजा अकुलाला तिसऱ्या सेटमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. रोमानियाच्या एलिसाबेटा समाराविरुद्ध 5 सेटच्या रोमहर्षक लढतीत अकुलाला पराभवाचा सामना करावा लागला. युरोपियन चॅम्पियन समारानं 8-11, 11-4, 7-11, 11-6, 11-8 असा विजय मिळवल्यानं रोमानियाला स्पर्धेत टिकून राहण्यास मदत झाली आणि त्यांनी 2-1 अशी आघाडी घेतली.

रोमानियानं साधली बरोबरी : महिला संघाच्या राउंड ऑफ 16 च्या चौथ्या फेरीत रोमानियाच्या बर्नाडेट स्झोक्सनं अर्चना कामथवर 11-5, 8-11, 11-7, 11-9 असा विजय मिळवला. सलग दुसऱ्या विजयासह रोमानियन संघानं भारताविरुद्ध 2-2 अशी बरोबरी साधली होती.

रोमानियाचा 3-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश : मनिका बत्रानं शेवटच्या आणि 5व्या निर्णायक लढतीत रोमानियाच्या एडिना डायकोनूचा 11-5, 11-9, 11-9 असा पराभव केला आणि भारताला प्रथमच महिला टेबल टेनिसच्या उपांत्यपूर्व फेरीत नेलं. आता भारतीय महिला टेबल टेनिस संघ उपांत्यपूर्व फेरीत अमेरिका किंवा जर्मनीशी भिडणार आहे.

हेही वाचा :

  1. स्टार शटलर सेनचं सुवर्ण 'लक्ष्य' हुकलं; मात्र इतिहास रचण्यासाठी हवा एक 'विजय' - Paris Olympics 2024
  2. ऑलिम्पिकचा बादशाह आहे 'हा' खेळाडू...! एकट्यानं जिंकली 162 देशांहून अधिक सुवर्णपदकं - Paris Olympics 2024

ABOUT THE AUTHOR

...view details