पॅरिस Vinesh Phogat Plea Result : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो कुस्तीच्या अंतिम सामन्यातून अपात्र ठरवल्याच्या विरोधात कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) मध्ये अपील दाखल केलं होतं. सीएएसच्या तदर्थ विभागातील त्याची सुनावणी पूर्ण झाली आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननं (IOA) सांगितलं की त्यांना अनुकूल निर्णयाची अपेक्षा आहे.
आज रात्री होईल निर्णय : रविवारी पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभाच्या आधी हा निर्णय येऊ शकतो, असे तदर्थ विभागाने म्हटले होते. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) कुस्तीपटू विनेश फोगटने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) च्या तदर्थ विभागासमोर तिच्या वजन गटात अपात्र ठरल्याबद्दल दाखल केलेल्या अर्जावर सकारात्मक निर्णय घेण्याची आशा आहे. त्याचा निर्णय आज रात्री साडेनऊपर्यंत येईल, CAS नं एक निवेदन जारी करुन ही माहिती दिली आहे. मात्र आजचा निर्णय आता उद्यावर ढकलण्यात आला आहे.
कोणी मांडली बाजू : विनेशच्या जागी क्यूबन कुस्तीपटू युस्नेलिस गुजमन लोपेझने फायनलमध्ये प्रवेश केला होता. जिला उपांत्य फेरीत विनेशकडून पराभव पत्करावा लागला होता. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटनं तिच्या अपीलमध्ये लोपेझसोबत संयुक्त रौप्यपदक देण्याची मागणी केली आहे. कारण मंगळवारी झालेल्या सामन्यांदरम्यान तिचं वजन निर्धारित मर्यादेत होतं. विनेशची बाजू सुप्रसिद्ध ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया यांनी मांडली.