महाराष्ट्र

maharashtra

ऑलिम्पिकमध्ये कोणत्या राज्यातील किती खेळाडूंचा सहभाग? हरियाणाचे 24 खेळाडू, महाराष्ट्राचे फक्त... - Paris Olympics 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 21, 2024, 11:08 AM IST

Paris Olympics : 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महाराष्ट्रासह विविध राज्यांतील खेळाडू सहभागी होणार आहेत. ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरलेल्या खेळाडूंच्या यादीवर एक नजर टाकूया.

Paris Olympics 2024
Paris Olympics 2024 (Source - ETV Bharat)

Paris Olympics 2024 : 'पॅरिस ऑलिम्पिक 2024'चा थरार सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. भारताच्या 117 खेळाडूंचं पथक या क्रीडा स्पर्धेत तिरंगा फडकवण्यासाठी सज्ज झालं आहे. या 117 खेळाडूंच्या पथकात पुन्हा एकदा हरियाणा राज्याचं वर्चस्व आहे. या राज्यातील सर्वाधिक 24 खेळाडूंचा ऑलिम्पिकमध्ये सहभाग आहे. यानंतर पंजाब 19 खेळाडूंसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर तामिळनाडू 13 खेळाडूंसह तिसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्राच्या फक्त पाच खेळाडूंना पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट मिळविता आलं.

'या' राज्यांतील एकही खेळाडू नाही : अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा या राज्यातील एकही खेळाडू पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभागी होणार नाही. यासोबतच पुद्दुचेरी, जम्मू आणि काश्मीर, अंदमान आणि निकोबार बेटे, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, लडाख आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातील कोणत्याही खेळाडूचा ऑलिम्पिकमध्ये सहभाग नाही.

कोणत्या राज्यातील किती आणि कोणते खेळाडू सहभागी होणार?

  • कर्नाटक (7 खेळाडू) : पूवम्मा एम.आर. (अ‍ॅथलेटिक्स), अश्विनी पोनप्पा (बॅडमिंटन), अदिती अशोक (गोल्फ), श्रीहरि नटराज (जलतरण), धिनिधी देशसिंघू (जलतरण), अर्चना कामत (टेबल टेनिस), रोहन बोपण्णा (टेनिस)
  • उत्तर प्रदेश (7 खेळाडू) : अन्नू राणी (अ‍ॅथलेटिक्स), पारुल चौधरी (अ‍ॅथलेटिक्स), प्रियांका गोस्वामी (अॅथलेटिक्स), राम बाबू (अ‍ॅथलेटिक्स), शुभंकर शर्मा (गोल्फ), ललितकुमार उपाध्याय (हॉकी), राजकुमार पाल (हॉकी)
  • हरियाणा (24 खेळाडू) :भजन कौर (तिरंदाजी), किरण पहल (अ‍ॅथलेटिक्स), नीरज चोप्रा (अ‍ॅथलेटिक्स), अमित पंघाल (बॉक्सिंग), जास्मिन लेम्बोरिया (बॉक्सिंग), निशांत देव (बॉक्सिंग), प्रीती पवार (बॉक्सिंग), दीक्षा डागर (गोल्फ), संजय (हॉकी), सुमित (हॉकी), बलराज पंवार (रोइंग), अनिश भानवाला (शूटिंग), मनू भाकर (शूटिंग), रमिता जिंदाल (शूटिंग), रायजा ढिल्लों (शूटिंग), रिदम सांगवान (शूटिंग), सरबज्योत सिंग (शूटिंग), सुमित नागल (टेनिस), अमन सहरावत (कुस्ती), अंशू मलिक (कुस्ती), अंतिम पंघाल (कुस्ती), निशा दहिया (कुस्ती), हृतिका रेड्डी (कुस्ती), विनेश फोगाट (कुस्ती)
  • आंध्र प्रदेश (4 खेळाडू) : धीरज बोम्मादेवरा (तिरंदाजी), ज्योती याराजी (अ‍ॅथलेटिक्स), ज्योतिका श्रीदांडी (अ‍ॅथलेटिक्स), सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी (बॅडमिंटन)
  • चंदीगड (2 खेळाडू) :अर्जुन बबुता (नेमबाजी), विजयवीर सिद्धू (शूटिंग)
  • आसाम (1 खेळाडू) :लोव्हलिना बोर्गेहेन (बॉक्सिंग)
  • दिल्ली (4 खेळाडू) : अमोज जेकब (अ‍ॅथलेटिक्स), तौलिका कॉप्रा (ज्युडो), राजेश्वरी कुमारी (नेमबाजी), मणिका बत्रा (टेबल टेनिस)
  • बिहार (1 खेळाडू) : श्रेयसी सिंग (शूटिंग)
  • महाराष्ट्र (5 खेळाडू) :प्रवीण जाधव (तिरंदाजी), अविनाश साबळे (अॅथलेटिक्स), सर्वेश कुशारे (अ‍ॅथलेटिक्स), चिराग शेट्टी (बॅडमिंटन), स्वप्नील कुसळे (शूटिंग)
  • गोवा (1 खेळाडू) :तानिषा क्रास्टो (बॅडमिंटन)
  • गुजरात (2 खेळाडू) : हरमित देसाई (टेबल टेनिस), मानव ठक्कर (टेबल टेनिस)
  • केरळ (6 खेळाडू) :अब्दुल्ला अबुबकर (अॅथलेटिक्स), मोहम्मद अजमल (अ‍ॅथलेटिक्स), मोहम्मद अनस (अ‍ॅथलेटिक्स), मिझो चाको कुरियन (अ‍ॅथलेटिक्स), पीआर श्रीजेश (हॉकी), एचएस प्रणय (बॅडमिंटन)
  • झारखंड (1 खेळाडू) : दीपिकाकुमारी (तिरंदाजी)
  • मध्य प्रदेश (2 खेळाडू) : विवेक सागर प्रसाद (हॉकी), ऐश्वर्या प्रतापसिंह तोमर (नेमबाजी)
  • उत्तराखंड (4 खेळाडू) : अंकिता ध्यानी (अ‍ॅथलेटिक्स), परमजीत बिश्त (अ‍ॅथलेटिक्स), सूरज पनवार (अ‍ॅथलेटिक्स), लक्ष्य सेन (बॅडमिंटन)
  • मणिपूर (2 खेळाडू) : मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग), नीलकांत शर्मा (हॉकी)
  • ओडिशा (2 खेळाडू) : अमित रोहिदास (हॉकी), किशोर जेन्ना (अ‍ॅथलेटिक्स)
  • पंजाब (19 खेळाडू) : अक्षदीप सिंग (अ‍ॅथलेटिक्स), तजिंदरपालसिंग तूर (अ‍ॅथलेटिक्स), विकास सिंग (अ‍ॅथलेटिक्स), गगनजीत भुल्लर (गोल्फ), गुरजंत सिंग (हॉकी), हार्दिक सिंग (हॉकी), हरमनप्रीत सिंग (हॉकी), जर्मनप्रीत सिंग (हॉकी), जुगराज सिंग (हॉकी), कृष्ण बहादूर पाठक (हॉकी), मनदीप सिंग (हॉकी), मनप्रीत सिंग (हॉकी), समशेर सिंग (हॉकी), सुखजित सिंग (हॉकी), अंजुम मुदगिल (शूटिंग), अर्जुन चिमा (नेमबाजी), सिफ्ट कार समरा (नेमबाजी), संदीप सिंग (नेमबाजी), प्राची चौधरी कालियार (अ‍ॅथलेटिक्स)
  • राजस्थान (2 खेळाडू) :अनंतजितसिंग नारुका (नेमबाजी), माहेश्वरी चौहान (नेमबाजी)
  • सिक्कीम (1 खेळाडू) :तरुणदीप राय (तिरंदाजी)
  • तामीळनाडू (13 खेळाडू) : जेसविन आल्ड्रिन (अ‍ॅथलेटिक्स), प्रवीण चित्रवेल (अ‍ॅथलेटिक्स), राजेश रमेश (अ‍ॅथलेटिक्स), संतोष तमिलरासन (अ‍ॅथलेटिक्स), सुभा वेंकटेशन (अ‍ॅथलेटिक्स), विथ्या रामराज (अ‍ॅथलेटिक्स), नेत्रा कुमनन, विष्णू सर्वणन, एलावेनिल वलारिवन (शूटिंग), पृथ्वीराज तोंडैमन (नेमबाजी), साथियान ज्ञानसेकरन (टेबल टेनिस), शरथ कमल (टेबल टेनिस), एन. श्रीराम बालाजी (टेनिस)
  • तेलंगणा (4 खेळाडू) : पी.व्ही. सिंधू (बॅडमिंटन), निखत झरीन (बॉक्सिंग), ईशा सिंह (नेमबाजी), श्रीजा अकुला (टेबल टेनिस)
  • पश्चिम बंगाल (3 खेळाडू) : अंकिता भक्त (तिरंदाजी), अनुष अग्रवाल (इक्वेस्ट्रियन ड्रेसेज इव्हेंट), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस)

ऑलिम्पिकमध्ये भारतानं किती पदक मिळवली? :26 जुलैपासून सुरू होणाऱ्या या ऑलिम्पिक स्पर्धेत भारत किती पदकांची कमाई करणार? याकडे देशातील क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारतानं आत्तापर्यंत एकूण 35 पदकांची कमाई केलीय. यात 10 सुवर्ण, 9 रौप्य आणि 16 कांस्यपदकांचा समावेश आहे.

हेही वाचा

  1. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचं संपूर्ण वेळापत्रक, कधी आणि कोणत्या वेळी होणार सामने, जाणून घ्या एका क्लिकवर - Paris Olympic 2024
  2. ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूचे पदक का काढून घेतले जाते? जाणून घ्या, 'डोपिंग'ची गंभीर समस्या - Paris Olympics 2024
  3. गौतमची 'गंभीर' मागणी पूर्ण; श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाला मिळणार 'हे' दोन नवीन कोचिंग स्टाफ - Indian Team Coaching Staff

ABOUT THE AUTHOR

...view details