कोलकाता IND vs ENG T20I : आयपीएल 2025 सुरु होण्यासाठी अजून सुमारे दोन महिने शिल्लक आहेत. या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झाला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं इंग्लंडमधील अनेक मोठ्या क्रिकेटपटूंना त्यांच्या संघात सामील केलं. यष्टीरक्षक फलंदाज फिल साल्टला 11.50 कोटी रुपयांची बोली लागली. अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोनला 8.75 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले आणि 21 वर्षीय जेकब बेथेलला 2.60 कोटी रुपये देण्यात आले.
Jacob Bethell dismissed for 7 in 14 balls.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 22, 2025
HARDIK PANDYA STRIKES! pic.twitter.com/9GVKyu7sgB
भारत दौऱ्याची खराब सुरुवात : इंग्लंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे. T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात आरसीबीचे तिन्ही इंग्लिश खेळाडू मैदानात उतरले. सलामीवीर फिल साल्टला त्याचं खातंही उघडता आलं नाही. अर्शदीप सिंगनं त्याला पहिल्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. लियाम लिव्हिंगस्टोनचीही परिस्थिती अशीच होती. त्याला वरुण चक्रवर्तीची फिरकी समजली नाही आणि तो दोन चेंडूंत बाद झाला. त्याचंही खातं उघडलं गेलं नाही.
RCB players performance in 1st T20 😂#INDvsENG pic.twitter.com/zns6yO8Gyo
— Atulya Kumar (@AtulyaK21589292) January 23, 2025
बेथेलचा क्रीजवर संघर्ष : जेकब बेथेलला इंग्लंड क्रिकेटचं भविष्य मानलं जातं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड चांगला होता पण दर्जेदार फिरकी गोलंदाजीसमोर त्याची खेळी खालावली. रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती यांच्याविरुद्ध प्रत्येक धाव घेण्यासाठी तो धडपडत होता. हार्दिक पांड्यानं बाद करण्यापूर्वी त्यानं 14 चेंडूत फक्त 7 धावा केल्या. त्याच्या खेळीत एकही चौकार नव्हता.
Agents 007 of RCB pic.twitter.com/iTqeX5ewxu
— Johns (@JohnyBravo183) January 22, 2025
फिरकी खेळणं हे एक मोठं आव्हान : भारतात होणाऱ्या सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाजी खेळणं हे एक मोठं आव्हान असतं. गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्ससाठी फिल साल्टनं चांगली कामगिरी केली होती पण संघाचे बहुतेक सामने सपाट विकेटवर खेळले गेले. लियाम लिव्हिंगस्टोन पंजाब किंग्ज संघाचा भाग होता. गेल्या हंगामात त्यानं 7 सामन्यात 22 च्या सरासरीने फक्त 111 धावा केल्या. यात एकही मोठ्या खेळीचा समावेश नव्हता. यानंतरही, आरसीबीनं त्याच्यावर सुमारे 9 कोटी रुपयांची बोली लावली.
हेही वाचा :