क्वालालंपूर U19 Women's World Cup : पुढील महिन्यात 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तानच्या यजमान पदाखाली ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात येणार आहे. मात्र यापुर्वीच त्यांच्या महिला संघ वर्ल्ड कपच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.
Ireland prevail over Pakistan in another thriller at the #U19WorldCup to qualify for the Super 6️⃣#PAKvIRE 📝: https://t.co/QdT2aH987t pic.twitter.com/pArKPMV3JO
— ICC (@ICC) January 22, 2025
विश्वचषकातून पाकिस्तान बाहेर : वास्तविक सध्या मलेशियाच्या भूमीवर 2025 चा महिला अंडर-19 T20 विश्वचषक आयोजित केला जात आहे. यात चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होत आहेत, ज्यांना प्रत्येकी चार गटात विभागण्यात आलं आहे. यानंतर, प्रत्येक गटातील टॉप-3 संघ सुपर-सिक्स फेरीसाठी पात्र ठरतील आणि प्रत्येक गटातील एक संघ बाहेर पडेल. यात पाकिस्तानी महिला संघाला त्यांच्या शेवटच्या गट फेरीच्या सामन्यात आयर्लंडविरुद्ध डकवर्थ लुईस नियमानुसार 13 धावांनी पराभव पत्करावा लागला. यामुळं पाकिस्तानी महिला संघ 2025 च्या अंडर-19 T20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे आणि विजेतेपद जिंकण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं आहे.
Raw emotions after Ireland stunned Pakistan in the #U19WorldCup 🥹 pic.twitter.com/8bnU4isfn3
— ICC (@ICC) January 22, 2025
फलंदाजांची खराब कामगिरी : पावसामुळं प्रभावित झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंड महिला संघानं 9 षटकांत 69 धावा केल्या. संघाकडून एलिस वॉल्सनं सर्वाधिक 31 धावांचं योगदान दिलं. यानंतर पावसामुळं पाकिस्तानी महिला संघाला डकवर्थ लुईस नियमांनुसार 73 धावांचं लक्ष्य मिळालं. पण पाकिस्तानी महिला संघाकडून एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही आणि संपूर्ण संघ 9 षटकांत फक्त 59 धावाच करु शकला. पाकिस्तानकडून कर्णधार कोमल खाननं सर्वाधिक 15 धावांची खेळी केली. गोलंदाज आणि फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळं त्यांना सामना गमवावा लागला.
पॉइंट्स टेबलमध्ये पाकिस्तानी महिला संघ शेवटच्या स्थानावर : 2025 च्या 19 वर्षांखालील T20 विश्वचषकासाठी पाकिस्तानी महिला संघाला गट ब मध्ये स्थान देण्यात आलं होतं. या स्पर्धेत त्यांनी तीन सामने खेळले, त्यापैकी संघाला एकही सामना जिंकता आला नाही. यामुळं, ते त्यांच्या गटात शेवटच्या स्थानावर राहिले. त्यांना तीन सामन्यांत फक्त एक गुण मिळाला आणि त्यामुळं ते 2025 च्या महिला 19 वर्षांखालील T20 विश्वचषकातून बाहेर पडावं लागलं.
Ireland reach Super Sixes after dramatic win against Pakistan in Johor at the @ICC Women's #U19WorldCup 🇲🇾
— Ireland Women’s Cricket (@IrishWomensCric) January 22, 2025
Match report 👉 https://t.co/qmk6RTaEk4#BackingGreen ☘️🏏 pic.twitter.com/ohLjSpOSmG
स्पर्धेत एकही सामना जिंकता आला नाही : पाकिस्तान संघाचा अमेरिकेविरुद्धचा पहिला सामना पावसामुळं होऊ शकला नाही. त्यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. यानंतर, त्यांना इंग्लंडविरुद्ध 6 विकेट्सनं दारुण पराभव पत्करावा लागला आणि आता आयर्लंडनं त्यांना 13 धावांनी पराभूत करुन स्पर्धेबाहेर काढलं. परिणामी, ग्रुप बी मधून, अमेरिका, आयर्लंड आणि इंग्लंडचे संघ आता सुपर-सिक्स फेरीसाठी पात्र ठरतील.
हेही वाचा :