अहमदाबाद 9 Wickets in an Innings : भारतातील स्थानिक प्रथम श्रेणी स्पर्धा रणजी करंडक ही देशातील तरुण प्रतिभेला पुढं आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. सहाव्या फेरीतही हेच दिसून आलं. उत्तराखंड विरुद्धच्या सामन्यात गुजरातचा डावखुरा फिरकी गोलंदाज सिद्धार्थ देसाईनं एकाच डावात 9 बळी घेत जबरदस्त कामगिरी केली आणि जगाला आपली प्रतिभा दाखवून दिली. एवढंच नाही तर त्यानं एक मोठा विक्रमही मोडला. खरं तर, गुजरात प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात, सिद्धार्थ आता एकाच डावात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे.
9⃣ of the very best 🔥
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 23, 2025
Gujarat's Siddharth Desai bowled a magnificent spell of 9⃣/3⃣6⃣ against Uttarakhand in Ahmedabad, registering the best bowling figures in an innings by a Gujarat bowler in #RanjiTrophy @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/77wEmZZ0yj pic.twitter.com/aLTOKTs3qv
65 वर्षांचा जुना विक्रम मोडला : आज 23 जानेवारी रोजी सुरु झालेल्या उत्तराखंड आणि गुजरात यांच्यातील सामन्यात सिद्धार्थ देसाईनं प्राणघातक गोलंदाजी केली. त्यानं एकट्यानं सलामीवीरासह 9 फलंदाजांच्या विकेट घेतल्या. अहमदाबादमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात त्यानं 15 षटकांत फक्त 36 धावा देत 9 विकेट्स घेतल्या. यासह त्यानं 65 वर्षांचा जुना विक्रम मोडला.
काय होता विक्रम : खरं तर, 1960-61 च्या रणजी ट्रॉफी हंगामात, गुजरातच्या जसुभा मोतीभाई पटेल यांनी सौराष्ट्रविरुद्ध एका डावात 21 धावा देत 8 विकेट्स घेतल्या होत्या. 2012 च्या हंगामात त्यानं 31 धावांत 8 बळी घेत त्याच्या विक्रमाची बरोबरी केली. आता, सिद्धार्थ गुजरातसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात दोघांपेक्षा एक बळी जास्त घेऊन सर्वोत्तम कामगिरी करणारा गोलंदाज बनला आहे.
Best bowling figures in an innings for Gujarat in First Class cricket :-
— Rhitankar Bandyopadhyay (@_rhitankar_) January 23, 2025
9/36 - Siddharth Desai v Uttarakhand, today
8/21 - Jasu Patel v Saurashtra, 1960
8/31 - Rakesh Dhruv v Rajasthan, 2012#RanjiTrophy
उत्तराखंड संघ 111 धावांवर ऑलआउट : या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर उत्तराखंड संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण अहमदाबादच्या टर्निंग पिचवर त्याच्या फलंदाजांकडे उत्तर नव्हते. गुजरातचा कर्णधार चिंतन गाजानं सुरुवातीपासूनच डावखुरा फिरकीपटू सिद्धार्थ देसाईला आक्रमणात आणले. याचा त्याला फायदा झाला. सिद्धार्थनं उत्तराखंडला पहिला धक्का 5व्या षटकात फक्त 15 धावांवर दिला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर त्यानं दुसऱ्या फलंदाजाला बाद केलं. मग त्यानं शेवटच्या चेंडूवर आणखी एक विकेट घेतली. म्हणजेच, एकाच षटकात 3 बळी घेऊन सिद्धार्थनं उत्तराखंडला गुडघे टेकण्यास भाग पाडलं.
🚨9 WICKETS IN AN INNINGS...!!
— DEEP SINGH (@CrazyCricDeep) January 23, 2025
- Siddharth Desai bowled a magnificent spell of 9/36 against Uttarakhand.
- the best bowling figures in an innings by a Gujarat bowler in Ranji Trophy. #RanjiTrophy #ranji #SiddharthDesai #Gujarat pic.twitter.com/KEIDMGF0OW
सिद्धार्थनं 9 फलंदाजांना केलं बाद : यानंतर कोणतीही मोठी भागीदारी होऊ शकली नाही. सिद्धार्थनं एका टोकापासून शिकार करत राहून 110 धावा पूर्ण होईपर्यंत 9 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. पण तो शेवटची विकेट हुकली, जी विशाल जयस्वालनं घेतली. अशाप्रकारे उत्तराखंडचा संपूर्ण संघ 111 धावांवरच कोसळला.
हेही वाचा :