नवी दिल्ली Pak vs Ban live streaming in India : आयसीसी टी 20 विश्वचषकाच्या गट-टप्प्यात पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाला शानदार पुनरागमन करण्याची संधी आहे. पाकिस्तान संघाला आता बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे. उभय संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे, जी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 साठी अत्यंत महत्त्वाची आहे. यात आम्ही तुम्हाला हा सामना कुठे पाहता येईल हे सांगणार आहोत. (pakistan vs bangladesh live streaming in india)
नाणेफेकीला विलंब : सध्या रावळपींडीत पाऊस सुरु असल्यानं नाणेफेकीला विलंब झाला आहे. पाकिस्तान संघानं पहिल्या कसोटीची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली असून कोणत्याही स्पेशलिस्ट फिरकीपटूला संधी दिलेली नाही. प्लेइंग इलेव्हनमध्ये चार वेगवान गोलंदाजांना संधी मिळाली आहे, जे संघाला ताकद देऊ शकतात. अशा परिस्थितीत, पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चाहते कधी, कुठे आणि कसा पाहू शकतात हे तुम्हाला माहिती आहे का? (pakistan national cricket team)
- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी खेळला जाईल? (shakib al hasan)
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात 21 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे.
- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील सर्व सामने कधी खेळले जातील?