क्राइस्टचर्च NZ vs ENG 1st Test : न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसन दुखापतीतून सावरला आहे. तो गेल्या 2 महिन्यांपासून क्रिकेटच्या दूर होता. पण इंग्लंडविरुद्धच्या क्राइस्टचर्च कसोटीच्या खेळीत त्यानं असं काही वाटू दिलं नाही. किंबहुना, या वर्षीही त्यानं इंग्लंडविरुद्ध मायदेशात आपला उत्कृष्ट कसोटी विक्रम कायम राखला आहे. जसा तो दुखापतीपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसला होता. अगदी त्याच पद्धतीनं तो खेळत होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत 3 शतकं झळकावणारा विल्यमसन इंग्लंडविरुद्धही शतकाच्या जवळ पोहोचला होता. पण, 7 धावांनी त्याला शतकानं हुलकावणी दिली. त्याच्या दमदार खेळीच्या बळावर कीवी संघानं पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी 83 षटकांत 8 बाद 319 धावा केल्या.
विल्यमसनचं 33वं कसोटी शतक हुकलं :93 धावांवर खेळत असताना केन विल्यमसनची विकेट इंग्लंडचा गोलंदाज ॲटकिन्सननं घेतली. म्हणजेच तो आपल्या 33व्या कसोटी शतकापासून फक्त 7 धावा दूर होता. शतक हुकल्याची खंत त्याला नक्कीच होती, पण असं असतानाही विल्यमसन क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकताना दिसला. वास्तविक, दुखापतीमुळं क्रिकेटपासून दूर राहूनही विल्यमसनच्या फलंदाजीवर त्याचा परिणाम झालेला नाही हे पाहून चाहत्यांना आनंद झाला. त्यामुळं केन विल्यमसन 93 धावांवर बाद होऊन 33वं कसोटी शतक हुकल्याची खंत असताना दुसरीकडे दुखापतीतून परतल्यानंतर दमदार खेळी खेळण्यात यश मिळाल्यानं चाहते मात्र आनंदी होते.