शारजाह India U19 vs Japan U19 Live : अंडर-19 आशिया कपमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा दुसरा सामना आज जपानविरुद्ध सुरु आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघानं स्पर्धेत दमदार पुनरागमन केलं. या सामन्यात जपाननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघानं झंझावाती सुरुवात करत जपानच्या गोलंदाजांवर एकहाती वर्चस्व ठेवलं. पहिल्या सामन्यातील अनपेक्षित पराभवानंतर भारतीय संघाकडून जोरदार बाउन्स बॅक अपेक्षित होता.
आयुष म्हात्रे (ETV Bharat) फलंदाजीत आयुषचं तांडव : या सामन्यात जपाननं भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिल्यावर आयुष म्हात्रे आणि वैभवनं मिळून त्याची गोलंदाजी उद्ध्वस्त केली. शारजाहमध्ये दोन्ही फलंदाजांनी 44 चेंडूत 65 धावांची भागीदारी केली. भारताला पहिला धक्का वैभवच्या रुपानं बसला. आठव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. वैभवनं 23 चेंडूत 23 धावा केल्या. त्यानं 3 चौकार आणि 1 षटकार मारला. दुसऱ्या टोकाला आयुषनं तुफानी फलंदाजी सुरुच ठेवली. त्यानं 29 चेंडूत 54 धावा केल्या. यामध्ये 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. आयुषनं 186.21 च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या.
कोण आहे आयुष म्हात्रे? : आयुष म्हात्रे हा देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा आहे. त्याचा जन्म 16 जुलै 2007 रोजी झाला. सध्या त्याचं वय 17 वर्षे 139 दिवस आहे. तो मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेतो. यात त्याला आतापर्यंत सहा प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली आहे. ज्यात त्यानं 11 डावात 40.09 च्या सरासरीनं 441 धावा केल्या आहेत. आयुष म्हात्रेच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोन शतकं आणि एक अर्धशतक आहे. यात त्याची वैयक्तिक सर्वोत्तम फलंदाजी 176 धावांची आहे. आयुषनं आतापर्यंत प्रथम श्रेणीत एकूण आठ षटकार आणि 53 चौकार मारले आहेत.
आयुष म्हात्रेनं पाकिस्तानविरुद्ध केली होती आक्रमक सुरुवात : त्या सामन्यातही आयुष म्हात्रेनं शानदार फलंदाजी केली होती. त्यानं 14 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीनं 20 धावा केल्या. मात्र, त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. दुसरीकडे, वैभव सूर्यवंशी अवघ्या 1 धावा करुन बाद झाला होता. जपानविरुद्धच्या सामन्यात आयुष आणि वैभवनं भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. परिणामी भारतानं आपल्या निर्धारित 50 षटकांत 6 बाद 339 धावा उभारल्या.
हेही वाचा :
- 15.5 ओव्हर बॉलिंग 5 धावा अन् 4 विकेट... करेबियन गोलंदाजानं क्रिकेटमध्ये लिहिला नवा अध्याय
- Live फुटबॉल सामन्यात चाहत्यांमध्ये राडा, 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; पाहा व्हिडिओ
- T20 विश्वचषकात कांगारुंविरुद्ध 'मॅचविनिंग' खेळी करणारा खेळाडू संघाबाहेर; युवा खेळाडूंसह संघ जाहीर