महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

जसप्रीत बुमराहची MCG वर 'सुपरफास्ट डबल सेंच्युरी'; एकाच वेळी मोडले अनेक विक्रम - JASPRIT BUMRAH RECORDS

जसप्रीत बुमराहनं कसोटी क्रिकेटमध्ये 200 बळी पूर्ण केले आहेत, बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये विकेट्सचं दुहेरी शतक पूर्ण करणारा सहावा भारतीय वेगवान गोलंदाज आहे.

Jasprit Bumrah Records
जसप्रीत बुमराह (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Dec 29, 2024, 9:44 AM IST

मेलबर्न Jasprit Bumrah Records : जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीनं एकापाठोपाठ एक नवीन विक्रम करत आहे, ज्यात त्यानं आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मेलबर्न स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा चौथा कसोटी विक्रम केला आहे. खेळाच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाचा धोकादायक फलंदाज ट्रॅव्हिस हेडची विकेट घेऊन त्यानं कसोटी क्रिकेटमधील विकेटचं द्विशतकही पूर्ण केलं. यासोबतच बुमराहनं अनेक नवीन विक्रमही केले आहेत. जसप्रीत बुमराह आता कसोटी क्रिकेटमध्ये 200 बळी घेणारा भारताचा सहावा वेगवान गोलंदाज ठरला आहे.

20 पेक्षा कमी सरासरीनं 200 कसोटी बळी घेणारा बुमराह पहिला गोलंदाज : जसप्रीत बुमराहनं बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यात ट्रॅव्हिस हेडची विकेट घेताच, ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 200वी विकेट होती आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कमी सरासरीनं 200 बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. बुमराहनं जेव्हा 200 वी कसोटी विकेट घेतली तेव्हा त्याची गोलंदाजीची सरासरी फक्त 19.56 होती. या बाबतीत बुमराहनं जयोल गार्नरचा विक्रम मोडला आहे, ज्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 200 बळी पूर्ण केले तेव्हा त्याची गोलंदाजीची सरासरी 20.34 होती.

कसोटीत सर्वात कमी सरासरीनं 200 बळी पूर्ण करणारे गोलंदाज :

  • जसप्रीत बुमराह - सरासरी 19.56
  • जयोल गार्नर - सरासरी 20.34
  • शॉन पोलॉक - सरासरी 20.39
  • वकार युनूस - सरासरी 20.61

कसोटीत सर्वात कमी चेंडूत 200 बळी घेणारा चौथा गोलंदाज : जसप्रीत बुमराह आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 200 विकेट्स पूर्ण करणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. बुमराहनं 8484 चेंडूत 200 कसोटी बळी पूर्ण केले. या यादीत पहिल्या स्थानावर पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार वकार युनूसचं नाव आहे, ज्यानं 7725 चेंडूत कसोटीत 200 बळी पूर्ण केले. रविचंद्रन अश्विननंतर जसप्रीत बुमराह हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 बळी पूर्ण करणारा भारताचा दुसरा गोलंदाज ठरला आहे.

कसोटीत सर्वात कमी चेंडूत 200 बळी घेणारे गोलंदाज :

  • वकार युनूस (पाकिस्तान) - 7725 चेंडू
  • डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका) - 7848 चेंडू
  • कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) - 8153 चेंडू
  • जसप्रीत बुमराह (भारत) - 8484 चेंडू

110 वर्षांत मेलबर्नवर बुमराहसारखा कोणी नाही!

बुमराहनं कसोटी क्रिकेटमधील 84 व्या डावात 200 बळी पूर्ण केले. त्यानं ही अप्रतिम स्क्रिप्ट मेलबर्नच्या मैदानावर लिहिली, जिथं आता त्याच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. बुमराह मेलबर्नमध्ये गेल्या 110 वर्षांत सर्वाधिक विकेट घेणारा विदेशी गोलंदाज ठरला आहे.

हेही वाचा :

  1. विशाखापट्टणम ते मेलबर्न... मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी बापानं सोडलं जॉब; पोरानं रचला इतिहास
  2. 121/0 ते 164/8... 'कीवीं'विरुद्ध पाहुण्यांनी गमावला हातातला सामना; 'ब्लॅक कॅप्स'ची मालिकेत आघाडी
  3. 'स्टुपिड, स्टुपिड, स्टुपिड...' ऋषभ पंत बाद होताच सुनील गावस्कर संतापले; पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details