महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी BCCI खेळाडूंवर मेहरबान; जय शाहांच्या 'या' घोषणेनं क्रिकेटर्स मालामाल - IPL 2025 - IPL 2025

Jay Shah on IPL 2025 : IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा केली. खेळाडूंना मालामाल करणारी ही घोषणा आहे. वाचा संपूर्ण बातमी....

Jay Shah on IPL 2025
आयपीएल 2025 (IANS Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 28, 2024, 7:56 PM IST

Updated : Sep 28, 2024, 8:43 PM IST

मुंबई Jay Shah on IPL 2025 : IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा केली. "संघात समाविष्ट असलेल्या खेळाडूंना सामन्याची फी म्हणून 7.5 लाख रुपये मिळतील. त्याचवेळी, सर्व लीग सामने खेळणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त 1.05 कोटी रुपये मिळतील," अशी घोषणा जय शाह यांनी केली. सोशल मीडियावर पोस्ट करत ही मोठी घोषणा केली.

जय शाह यांची पोस्ट काय : शाह यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "आयपीएलमधील सातत्य आणि उत्कृष्ट कामगिरी साजरी करण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलत, आमच्या क्रिकेटपटूंसाठी प्रति सामना 7.5 लाख रुपये मॅच फी लागू करताना आम्हाला आनंद होत आहे. एका हंगामात सर्व लीग सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूला त्याच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त 1.05 कोटी रुपये मिळतील. प्रत्येक फ्रँचायझी या हंगामासाठी 12.60 कोटी रुपये मॅच फी म्हणून वाटप करेल. आयपीएल आणि आमच्या खेळाडूंसाठी हे नवीन पर्व आहे." यामुळं मेगा लिलावपूर्वी भारतीय खेळाडूंची चांदी झाली आहे.

घोषणा कोणासाठी फायदेशीर? : आयपीएलची सुरुवात ही २००८ मध्ये झाली. तेव्हापासून २०२४ पर्यंत खेळाडूंना समान रक्कम दिली गेली. त्यासाठी खेळाडू हे करारबद्ध होते. त्यामुळं खेळाडूंना वेगळी मॅच फी देण्यात आली नाही. मात्र, जय शाह यांच्या घोषणेनंतर आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त मॅच फी देखील दिली जाणार आहे. ज्या खेळाडूंना कमी किमतीत करारबद्ध केलं जातं, त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर ठरणार आहे.

क्रिकेटर्स होणार मालामाल : IPLचं सातत्य टिकवण्यासाठी आणि उत्कृष्ट कामगिरीचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही आमच्या क्रिकेटपटूंसाठी मानधनात वाढ करत असल्याचं जय शाह यांनी म्हटलंय. त्यानुसार, आता आयपीएल खेळणाऱ्या क्रिकेटर्संना प्रत्येक सामन्यासाठी 7.5 लाख रुपये देण्यात येणार आहेत. आयपीएलच्या एका हंगामात सर्व साखळी सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूला त्याच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त 1 कोटी 05 लाख रुपये बोनसही मिळेल. त्यामुळे, आयपीएल क्रिकेटर्स आणखी मालामाल होणार आहेत.

हेही वाचा :

  1. IPL 2025 मध्ये सामन्यांची संख्या वाढणार? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - IPL 2025
  2. MI पासून CSK पर्यंत, प्रत्येक संघ कोणत्या 5 खेळाडूंना करु शकतो रिटेन, वाचा सर्व यादी - Players Retention for IPL 2025
  3. चेन्नईत शतक झळकावताच ऋषभ पंतबाबत IPL लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सनं घेतला मोठा निर्णय - IPL 2025 Mega Auction
Last Updated : Sep 28, 2024, 8:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details