नागपूर Team India in Nagpur : भारतीय क्रिकेट संघानं T20 मालिकेत इंग्लंडला पराभवाची धूळ चारत पाच सामन्यांची मालिका 4-1 च्या मोठया फरकानं खिशात घातलीय. T20 मालिकेनंतर आता भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या जमठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर 6 फेब्रुवारी खेळला जाणार आहे. यासाठी दोन्ही संघ आज संध्याकाळी नागपूरात दाखल होणार आहेत. मात्र, रविवारी रात्री उशिरा भारतीय क्रिकेट संघातील 5 खेळाडू नागपुरात दाखल झाले आहेत. यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शुभम गिल, यशस्वी जायसवाल व रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे तर उर्वरित खेळाडू हे आज नागपूर येणार आहेत. भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू नागपूरात दाखल झाल्यानं त्यांचे फॅन्स मात्र उत्साही झाले आहेत.
आज करणार खेळाडू सराव : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला सामना नागपूरच्या जामठा मैदानावर 6 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. त्यासाठी आधी नागपुरात दाखल झालेला भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शुभम गिल, यशस्वी जायसवाल आणि रवींद्र जडेजा हे आज दुपारच्या दरम्यान सराव करणार आहेत. तसंच आज संध्याकाळी भारतीय संघ आणि इंग्लंडचा संघ नागपूरत दाखल होणार आहे. त्यानंतर उद्या दोन्ही संघ जामठा येथील व्हीसीएच्या मैदानावर सत्रात सराव करणार आहेत. 19 फेब्रुवारीला सुरु होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीपूर्वी दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे.