अल अमेरत IND vs PAK Live Streaming :भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ इमर्जिंग आशिया कप T20 मध्ये 19 ऑक्टोबर रोजी ओमानमधील अल अमेरत इथं आमनेसामने येणार आहेत. यावेळी ही स्पर्धा 18 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या कालावधीत अल अमेरत, ओमान इथं खेळवली जात असून, या स्पर्धेची ही सहावी आवृत्ती आहे.
स्पर्धेत किती संघ सहभागी : यावेळी इमर्जिंग आशिया चषक T20 फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे, ज्यात भारत आणि पाकिस्तानच्या अ संघांव्यतिरिक्त हाँगकाँग, ओमान, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि यूएईचे संघही सहभागी होत आहेत. यावेळी भारतीय अ संघाला स्पर्धेत अ गटात स्थान मिळालं असून त्यात पाकिस्तान व्यतिरिक्त यूएई आणि ओमानचे संघही सहभागी आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची वेळ काय :
भारतीय संघ इमर्जिंग आशिया चषक T20 मधील आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध अ गटातील पहिल्या सामन्यानं करेल. हा सामना ओमानमधील अल अमेरत क्रिकेट मैदानावर होणार आहे. ज्यात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामना सुरु होईल. युवा खेळाडू तिलक वर्मा या स्पर्धेत भारतीय अ संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहेत, तर मोहम्मद पाकिस्तानी अ संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. दोन्ही गटातील अव्वल-2 संघ उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित करतील. गेल्या वेळी इमर्जिंग आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय अ संघाला पाकिस्तानविरुद्ध 128 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता, अशा परिस्थितीत भारतीय संघाची नजर हा सामना जिंकून विजयी सुरुवात करण्यावर असेल.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं थेट प्रक्षेपण तुम्ही टीव्हीवर कुठं पाहू शकता?
इमर्जिंग आशिया कप 2024 मधील भारत आणि पाकिस्तान अ संघ यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल, तर चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहू शकतात, ज्यात हा सामना स्टार स्पोर्ट्स 1 वर प्रसारित केला जाईल.