मेलबर्न Novak Djokovic Retires : ऑस्ट्रेलियन ओपन 2025 मध्ये एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. 10 वेळा चॅम्पियन राहिलेला सर्बियाचा नोवाक जोकोविच उपांत्य फेरीचा सामना अर्ध्यावरच सोडून मैदानाबाहेर गेला. खरंतर, तो दुखापतीनं त्रस्त आहे आणि पहिला सेट गमावल्यानंतर, तो पुढं जाण्यासाठी स्वतःला तंदुरुस्त वाटला नाही आणि निघून गेला. ही घटना आश्चर्यकारक आहे कारण जोकोविचला स्पर्धा जिंकण्यासाठी फेव्हरिट मानलं जात होतं. त्याच्या माघारीमुळं जर्मनीच्या दुसऱ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हला अंतिम फेरीत पोहोचता आलं.
Not how we wanted your campaign to end, @djokernole.
— #AusOpen (@AustralianOpen) January 24, 2025
Thank you for another wonderful Australian summer. Well played and best wishes for a speedy recovery.#AO2025 pic.twitter.com/d5VJ6YNBeN
जोकोविच दुखापतीनं त्रस्त : 37 वर्षीय जोकोविचची दुखापत गंभीर असल्याचं मानलं जात आहे आणि मेलबर्नच्या रॉड लेव्हर अरेना इथं झ्वेरेव्हविरुद्धच्या पहिल्या सेटमध्ये तो संघर्ष करताना दिसला. त्यानं अनेक चुकाही केल्या. टायब्रेकरमध्ये झ्वेरेव्हनं पहिला सेट 7-6 असा जिंकण्यात यश मिळवलं. यानंतर लगेचच, जोकोविचनं बॅग उचलली आणि पंचांना कळवलं की तो सामना पुढं चालू ठेवू शकत नाही. या स्पर्धेत जोकोविचचा आतापर्यंतचा प्रवास शानदार राहिला आहे. त्यानं क्वार्टर फायनलमध्ये स्पॅनिश स्टार कार्लोस अल्काराजचा 4-6, 6-4, 6-3, 6-4 असा पराभव केला होता.
🤯 @alexzverev claims an extraordinary first set - and ultimately the match.
— #AusOpen (@AustralianOpen) January 24, 2025
Having battled through the set, @djokernole has been forced to retire due to injury.@wwos • @espn • @eurosport • @wowowtennis • #AusOpen • #AO2025 pic.twitter.com/uH2iiLJaVC
जोकोविचचा प्रवास : जोकोविचनं पहिल्या फेरीत निशीश बसवरेड्डीचा 4-6, 6-3, 6-4, 6-2 असा पराभव केला. यानंतर, दुसऱ्या फेरीच्या सामन्यात त्यानं जे फारियाचा 6-1, 7-6, 6-3, 6-2 असा पराभव केला. तिसऱ्या फेरीत जोकोविचनं माचॅकचा 6-1, 6-4, 6-4 असा पराभव केला. त्यानंतर चौथ्या फेरीत त्यानं लेचकाचा 6-3, 6-4, 7-6 असा पराभव केला. क्वार्टर फायनलमध्ये तो अल्काराझसाठी खूपच मजबूत असल्याचं सिद्ध झाले. जोकोविचला या स्पर्धेत सातवं मानांकन देण्यात आलं.
FIRST #AusOpen final for Sascha 🙌 pic.twitter.com/fiVflVyuIR
— #AusOpen (@AustralianOpen) January 24, 2025
जोकोविचनं जिंकले 24 ग्रँड स्लॅम : जोकोविच त्याच्या 25 व्या ग्रँड स्लॅमचे लक्ष्य ठेवून होता, पण त्याचा प्रवास असा संपेल याची कोणीही कल्पना केली नव्हती. त्यानं 2008, 2011, 2012, 2013, 2015, 2016, 2019, 2020, 2021 आणि 2023 मध्ये हे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले आहे. याशिवाय, तो तीन वेळा फ्रेंच ओपन चॅम्पियन, सात वेळा विम्बल्डन चॅम्पियन आणि चार वेळा यूएस ओपन चॅम्पियन राहिला आहे. क्वार्टर फायनलमध्ये अल्काराझवरचा त्याचा विजय हा ऑस्ट्रेलियन ओपनमधील त्याचा 99 वा विजय होता पण तो या वर्षी ग्रँड स्लॅममध्ये विजयाचं शतक पूर्ण करु शकणार नाही. जोकोविचनं सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदं जिंकली आहेत आणि तो बिग थ्रीमध्ये एकमेव सक्रिय खेळाडू आहे. रॉजर फेडरर (20 ग्रँड स्लॅम) आणि राफेल नदाल (22 ग्रँड स्लॅम) यांनी निवृत्ती घेतली आहे.
" i played one of my best sets... and i won 7-5 in a tiebreak while he was injured!
— #AusOpen (@AustralianOpen) January 24, 2025
i don't know... maybe novak is too good for the sport!"
😂 @alexzverev.#AO2025 pic.twitter.com/WL0BdGmtMw
झ्वेरेव्ह पहिल्यांदाच अंतिम फेरीत : झ्वेरेव्हनं पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याआधी तो 2024 मध्ये फ्रेंच ओपन आणि 2020 मध्ये यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. तथापि, झ्वेरेव्हनं अद्याप कोणतंही ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकलेलं नाही. सिनेरनं 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकलं. यापूर्वी, मॅडिसन कीज आणि आर्यना सबालेंका यांनी महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीचा अंतिम सामना शनिवारी आणि पुरुष एकेरीचा अंतिम सामना रविवारी खेळवला जाईल.
हेही वाचा :