महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

T20 विश्वविजेत्यांविरुद्ध भारतीय महिला संघ पराभवाचा बदला घेणार? पहिला वनडे मॅच भारतात 'इथं' पाहा लाईव्ह

भारत आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघात आजपासून वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेत तीन सामने खेळवले जाणार असून हे सर्व सामने अहमदाबादला होणार आहेत.

INDW vs NZW 1st ODI Live Streaming
भारतीय महिला क्रिकेट संघ (ANI Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : 4 hours ago

अहमदाबाद INDW vs NZW 1st ODI Live Streaming :भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी दीड वाजल्यापासून खेळवला जाईल. या मालिकेत भारतीय संघाची कमान हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर आहे. तर न्यूझीलंडचं नेतृत्व सोफी डिव्हाईन करत आहे.

भारतीय संघात मोठे बदल : अलीकडेच, ICC महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये, सोफी डिव्हाईनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडच्या महिला संघानं प्रथमच विजेतेपदावर कब्जा केला. त्यामुळं न्यूझीलंडचं मनोबल खूप उंच आहे. तर, भारतीय महिला संघ ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला होता. भारतीय संघाची स्फोटक यष्टिरक्षक-फलंदाज ऋचा घोष बोर्डाच्या परीक्षेमुळं आगामी मालिकेत खेळणार नाही. या मालिकेसाठी आशा शोभना आणि पूजा वस्त्राकर देखील भारतीय संघाचा भाग नाहीत.

कीवी संघात नवख्या खेळाडूचा समावेश : दुसरीकडे यष्टिरक्षक फलंदाज पॉली इंग्लिशला न्यूझीलंड संघात प्रथमच वनडे संघात स्थान मिळालं आहे. गेल्या काही काळापासून तिनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा रुळावर येण्यासाठी उत्सुक असेल. स्मृती मंधानाकडून संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. या संघात दीप्ती शर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्स सारख्या अनुभवी खेळाडू तसंच सायली सतगरे आणि प्रिया मिश्रा या नवोदित खेळाडूंचा समावेश आहे, जे त्यांच्या पहिल्या वनडे मालिकेत छाप पाडण्यासाठी सज्ज असतील.

दोन्ही संघाची हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : भारतीय महिसा संघ आणि न्यूझीलंड महिला संघ यांच्यात आतापर्यंत एकूण 54 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यात भारतीय महिसा संघानं 20 सामने जिंकले आहेत. तर, न्यूझीलंड संघानं 23 सामने जिंकले आहेत. दरम्यान, एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.

खेळपट्टी कशी असेल : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांपेक्षा फलंदाजांसाठी अधिक योग्य आहे. फलंदाज मोठ्या धावा काढू शकतात आणि दव दुसऱ्या हाफमध्ये गोष्टी सुलभ करु शकतात. नाणेफेक जिंकणारा संघ इथं लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेईल. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना अधिक फायदा होतो. या खेळपट्टीवर 31 एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्या डावात सरासरी 243 धावा आहेत. खेळ जसजसा पुढं जाईल तसतसे फिरकीपटू खेळात येतील अशी अपेक्षा आहे, परंतु वेगवान गोलंदाजांना नवीन चेंडू आणि वेगातील फरकांचा प्रभावीपणे उपयोग करावा लागेल.

हवामान कसं असेल : आजपासून म्हणजेच 24 ऑक्टोबरपासून अहमदाबादमध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तर सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. मात्र, काळानुसार उष्मा वाढणार असून, दुपारी तापमान 32 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला वनडे सामना कधी खेळला जाईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना गुरुवारी (24 ऑक्टोबर 2024) होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना कुठं खेळवला जाईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना किती वाजता खेळवला जाईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. त्याची नाणेफेक अर्धा तास आधी दुपारी 1 वाजता होईल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना तुम्ही टीव्हीवर कुठं पाहू शकता?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना भारतातील स्पोर्ट्स-18 नेटवर्कवर प्रसारित केला जाईल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर केलं जाईल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :

भारत : यास्तिका भाटिया, उमा छेत्री (यष्टीरक्षक), हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेआय रॉड्रिग्स, शफाली वर्मा, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, राधा यादव, ए रेड्डी, रेणुका सिंग, श्रेयंका पाटील.

न्यूझीलंड :एमएल ग्रीन, आयसी गेज (यष्टिरक्षक), बीएम हॅलिडे, जॉर्जिया प्लिमर, एसडब्ल्यू बेट्स, एसी केर, एसएफएम डिव्हाईन (सी), ईडन कार्सन, एचएम रो, मॉली पेनफोल्ड, एलएमएम ताहुहू.

हेही वाचा :

  1. पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक झळकावणाऱ्या खेळाडूला संघात स्थान नाही; नव्या कर्णधारासह इंग्लंड संघाची घोषणा
  2. 344 धावा, 20 षटकांत... जे भारताला जमलं नाही, ते झिम्बाब्वेनं केलं; T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'असं' घडलं नव्हतं

ABOUT THE AUTHOR

...view details