ETV Bharat / entertainment

'बिग बॉस मराठी 5' फेम निखिल दामलेचा डान्स व्हिडिओ झाला सोशल मीडिया व्हायरल, चाहत्यांनी केलं कौतुक - BIGG BOSS MARATHI

'बिग बॉस मराठी 5'मधील निखिल दामलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो धमाकेदार डान्स करत आहे.

nikhil damle
निखिल दामले (nikhil damle - (Instagram))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 24, 2024, 1:33 PM IST

मुंबई : 'बिग बॉस मराठी 5' हा शो संपून दोन आठवडे उलटले आहेत, मात्र तरीही या शोमधील काही स्पर्धक सतत चर्चेत आहेत. सध्या 'बिग बॉस मराठी 5'मधील स्पर्धकांची चर्चा सर्वत्र सुरू आहे. निक्की तांबोळी पासून तर सूरज चव्हाणपर्यंतचे असे काही स्पर्धक आहेत, ज्यांनी या शोद्वारे खूप फेम मिळवलं. आता यामध्ये निखिल दामलेचा देखील समावेश आहे. सोशल मीडियावर त्याचा एका व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तो सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओवर अनेक चाहते कमेंट्स करून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्याचा धमाकेदार डान्स पाहून अनेक मुली देखील त्याच्या आता प्रेमात पडल्या आहेत.

'बिग बॉस मराठी 5'मधील निखिल दामलेचा व्हिडिओ व्हायरल : 'बिग बॉस मराठी 5'मध्ये तिसऱ्याच आठवड्यात निखिल दामले बेघर झाला होता. दरम्यान 'बिग बॉस'च्या घरात पहिल्या आठवड्यात पुरुषोत्तम दादा पाटील बेघर झाले होते. दुसऱ्या आठवड्यात एकही स्पर्धक घराबाहेर गेलं नाही. मात्र तिसऱ्या आठवड्यात एक नाहीतर तर दोन स्पर्धक बेघर झाले होते. यात निखिल दामले आणि योगिता चव्हाण यांचा समावेश होता. 'बिग बॉस मराठी'मध्ये निखिलचा खेळ हा प्रेक्षकांना फार जास्त पाहायला मिळाला नाही. दरम्यान निखिलचा डान्स पाहून आता नेटकरी हे थक्क झाले आहेत. निखिलनं रणबीर कपूरच्या 'अजब गजब प्रेम कहानी'मधील 'प्रेम की नैया' गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

निखिल दामलेचं वर्कफ्रंट : दरम्यान या व्हिडिओच्या पोस्टमध्ये एका चाहत्यांनी लिहिलं 'वा दामले सर खतरनाक' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'घरामध्ये असं जर मनोरंजन केलं असं तर आज शोमध्ये जास्त वेळ टिकला असता.' आणखी एकानं लिहिलं, 'निखिल तू हा डान्स 'बिग बॉस'मध्ये का नाही केला, वोट तुला मिळाले असते.' निखिलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'रामा राघव', 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' ,' हृदयात् वाजे समथिंग' यामध्ये दिसला आहे.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस मराठी 5' फेम निक्की तांबोळीनं वर्षा उसगावकरबद्दल केलं वक्तव्य, आली चर्तेत
  2. 'तू माझी हिरोईन आहेस' 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाणला भेटायला आली मैत्रिण, व्हिडिओ व्हायरल
  3. 'बिग बॉस'मराठी फेम सूरज चव्हाण, अभिजीत सावंतनं घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.