ETV Bharat / health-and-lifestyle

या '5' गोष्टी सांगणार तुमचं मानसिक आरोग्य कसं आहे - MENTAL HEALTH

How To Check You Mental Health: दिवसेंदिवस मानसिक आरोग्य विषयक समस्या वाढत आहेत. यामध्ये तरुणपिढी जास्त भरळली जात आहे. वाचा सविस्तर

How To Check You Mental Health
मानसिक आरोग्य (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Oct 24, 2024, 1:36 PM IST

How To Check You Mental Health: तणावपूर्ण जीवनशैलीमुळे आरोग्यविषयक अनेक समस्या वाढू लागल्या आहेत. त्यामध्ये मानसिक आरोग्य पूर्णपणे ढासळत चालंलं आहे. अपयश, बदलती जीवनशैली, परीक्षेमध्ये अपयश, प्रेमप्रकरण, कामाचं प्रेशर, करिअरची चिंता, व्यवसायामध्ये अपयश अशा एक ना अनेक कारणांमुळे लोक नैराश्याचे शिकार होत आहेत. यात तरुणपिढी जास्त भरळली जात आहे. कामाच्या व्यापामुळे तरुणांना प्रचंड थकवा जाणवतो. यामुळे त्यांना सतत चिंडचिड होत असते. त्यातही आपण अनेकदा आपल्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. यामुळे आपण नैराश्याच्या खोल दरीत लोटले जात आहोत. परंतु, असे काही लक्षणं आहेत. जे आपण नैराश्याचे शिकार आहोत याची जाणीव करुन देतात. चला तर पाहूया कोणत्या गोष्टी सांगतात की तुमचं मानसिक आरोग्य कसं आहे.

How To Check You Mental Health
मानसिक आरोग्य (ETV Bharat)
  • विचारशक्ती: लहान लहान संकट आलं तरी हाताळता न येणे, सतत वैचारिक गोंधळ, आव्हानांपासून दूर पडणे, कम्फर्टे झोन मधून बाहेर पडायला घाबरणे, नियमित असुरक्षित वाटणे, काही अप्रिय घटना घडली की सैरभैर होणे अशा गोष्टी मानसिक संतुलन बिघडलं आहे हे दर्शवतात. तर समस्यांकडे वस्तुनिष्टतेणं पाहणे, नियमित कम्फर्ट झोनच्या बहेर जावून विचार करणे तसंच नेहमी जोखिम स्विकारणे या गोष्टी मानसिक दृष्ट्या बलवान असल्याचं सिद्ध करतात.
  • एकटेपणा: सतत एकटं राहणं पसंत करणे, कुटुंबियांसोबत वेळ न घालवणे, माणसांपेक्षा इतर गोष्टींमध्ये रमणे, सतत एकटं कुठं तरी जावून बसणे हे मानिसक दृष्ट्या दूर्बल असल्याची लक्षणं आहेत. त्याचबरोबर सतत कोणत्या ना कोणत्या कामात स्वतःला गुंतवूण ठेवणे, संपूर्ण वेळ घरात राहणे, छंद नसणे, सुट्टी न घेणे हे मानसिक आजारांना आमंत्रण देण्याची लक्षणं आहेत.
  • भूक: जेवण्याची इच्छा नसणे किंवा योग्य वेळी भूक न लागणे तसंच सतत भूक लागणे आणि अजिबात भूक न जाणवणे ही मनस्वाथ्याचे लक्षणं असू शकते. चिंतारोग किंवा डिप्रेशन असल्यास याचा परिणाम भूकेवर होतो. यामुळे तुमच्या बाजूला असे लोक आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • झोप: अस्वस्थ झोप, झोपून उठल्यावरही थकवा जाणवणे, निद्रानाश हे मानसिक दृष्ट्या असंतुलन दर्शवते. असह्य ताण किंवा डिप्रेशन असल्यास झोपेची वारंवारता वाढते. तसंच मनातले विचार नियंत्रित करता येत नसतील तर झोप लागत नाही. नियमित 7-8 तास शांत झोप घेणे ही निरोगी मनाचं लक्षण आहे. तुम्हालाही झोपेसंबंधित समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • अपयश: प्रत्येक अपयशाला व्यक्तीगत मानणे, साध्या अपयशाला देखील खचून जाणे, हे मानसिक रोगांचे निर्देशक आहेत. तरुण वयातील लोकांमध्ये हे जास्त दिसून येतात. जसं की प्रेमामध्ये अपयश किंवा परिक्षेतील अपयश पचवता न येणे. हे मासिक दृष्ट्या अप्रगल्भ असल्याचे लक्षण असू शकते.

संदर्भ

https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK20369/

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. 'ही' लक्षणं दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या! तुम्हालाही असू शकतो 'ब्रेन स्टोक'
  2. तुम्ही सतत चिंताग्रस्त असता का? ट्राय करा 'या' टिप्स

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.