रावळपिंडी PAK vs ENG 3rd Test : भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत असतानाच पाकिस्तानचा संघही आजपासून रावळपिंडी इथं इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळण्यासाठी आला आहे. रावळपिंडी कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, या सामन्याच्या खेळपट्टीबद्दल आधीच अंदाज लावला जात होता की ती फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरेल आणि त्यामुळंच पाकिस्तान संघानं सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही बाजूंनी फिरकी गोलंदाजांसह गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासह, पाकिस्तान संघानं कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच अशी कामगिरी केली आहे, जी केवळ भारतीय संघ आणि बांगलादेश संघानं केली आहे.
Pakistan spinners weave their magic in Rawalpindi 🪄#WTC25 | #PAKvENG 📝: https://t.co/Zesm7xdzBt pic.twitter.com/9PBanBpabu
— ICC (@ICC) October 24, 2024
कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाकिस्ताननं पहिल्या दिवशी 2 फिरकीपटूंसह केली सुरुवात : पाकिस्तानी संघाचा कर्णधार शान मसूदनं नाणेफेक हरल्यानंतर आपल्या दोन्ही फिरकी गोलंदाजांसह गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासह मसूदचं नाव कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशा यादीत सामील झालं ज्यात पाकिस्तानच्या कोणत्याही कर्णधाराचा समावेश नव्हता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच, भारतीय संघानं 1964 साली इंग्लंडविरुद्धच्या कानपूर कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही बाजूंनी फिरकी गोलंदाजांसह गोलंदाजी सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर 2018 आणि 2019 मध्ये बांगलादेश संघानं असंच काही केलं. आता असंच पाकिस्तान संघाकडून पाहायला मिळालं आहे.
Half the England side back in the pavilion at lunch on day one 🏏
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 24, 2024
Productive morning for Sajid and Noman 🎯#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/LFXRGe84Mg
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्याच दिवशी दोन्ही बाजूंनी फिरकी गोलंदाजीला सुरुवात :
- मोटागनहल्ली जयसिम्हा आणि सलीम दुर्रानी - विरुद्ध इंग्लंड (कानपूर कसोटी, 1964)
- मेहदी हसन मिराज आणि अब्दुर रज्जाक - विरुद्ध श्रीलंका (मीरपूर कसोटी, 2018)
- तैजुल इस्लाम आणि शकिब अल हसन - विरुद्ध अफगाणिस्तान (चट्टोग्राम कसोटी, 2019)
- साजिद खान आणि नौमान अली - विरुद्ध इंग्लंड (रावळपिंडी कसोटी, वर्ष 2024)*
Spinners dominate in Rawalpindi with Sajid Khan picking up 6️⃣ wickets ☄️
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 24, 2024
England are all out for 267 in the first innings 🏏#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/0gLoeCytPt
फिरकीत अडकले इंग्रज फलंदाज : या सामन्यात इंग्लंडनं पहिल्या डावात सर्व गडी गमावून 267 धावा केल्या. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. या सामन्यात इंग्लंडकडून जेमी स्मिथनं 91 धावांची मौल्यवान खेळी खेळली. तसंच यष्टिरक्षक फलंदाज जेमी स्मिथ व्यतिरिक्त बेन डकेटने 52 धावा केल्या आणि गस ऍटकिन्सननंही 39 धावांचं योगदान दिलं. पाकिस्तानकडून साजिद खाननं सात तर नोमान अलीनं तीन बळी घेतले. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनी एका डावात सर्व दहा विकेट आहेत. यात इंग्लंडच्या संघाविरुद्ध चारवेळा हा पराक्रम केला आहे.
हेही वाचा :