ETV Bharat / technology

सॅमसंग तीन वेळा फोल्डिंग स्मार्टफोन लॉंच करण्याची शक्यता - SAMSUNG TRI FOLD PHONE

सॅमसंग ट्राय फोल्ड फोन लॉंच करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी Huawei नं जगातील पहिला ट्राय फोल्ड लॉंच केला होता.

Samsung
सॅमसंग (Samsung)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 24, 2024, 1:36 PM IST

हैदराबाद : सॅमसंगचे बाजारात अनेक हँडसेट उपलब्ध आहेत, आता कंपनी ट्राय फोल्ड सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. सॅमसंग 2025 साली आपला पहिला ट्राय फोल्ड फोन लॉंच करू शकतो. जागतिक बाजारात लॉंच होणारा हा जगातील पहिला ट्राय फोल्ड फोन देखील असू शकतो. यामध्ये डिस्प्ले दोनदा फोल्ड करता येतो. Huawei ने गेल्या महिन्यात जगातील पहिला Tri Fold फोन Huawei Mate XT लॉंच केला होता, पण तो जागतिक बाजारात लॉंच झाला नव्हता.

ट्राय फोल्ड फोन : मीडिया रिपोर्ट्सनुसार सॅमसंग मार्केटमध्ये स्पर्धा करण्याची तयारी करत आहे. या कोरियन कंपनीला अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. कारण Huawei सध्या तरी सर्व बाजारपेठेत फपलब्ध नाहीय. सॅमसंगनं ट्राय फोल्डवर काम सुरू केलं आहे, ज्यामध्ये स्क्रीन दोनदा फोल्ड केली जाऊ शकते. ती Huawei Mate XT सारखी असेल. सॅमसंग पुढील वर्षी ट्राय फोल्ड फोन लॉंच करू शकते. रिपोर्टनुसार सॅमसंग पुढील वर्षी ट्राय फोल्ड लॉन्च करू शकते. ट्राय फोल्ड स्क्रीनच्या विकासाचं काम सॅमसंगच्या डिस्प्लं विंगनं केलं आहे. मात्र, अद्याप लॉन्चिंगबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Huawei Mate XT : Huawei Mate XT फक्त चीनमध्ये उपलब्ध आहे. Huawei Mate XT हा सध्या एकमेव फोन आहे जो Tri Fold सह येतो. तथापि, ते चीनबाहेर उपलब्ध नाही. Huawei वर अमेरिकन बाजारात बंदी घातली गेलीय. तेव्हापासून तो आंतरराष्ट्रीय बाजारात फार कमी फ्लॅगशिप हँडसेट लाँच करत आहेत. सॅमसंगनं पुढच्या वर्षी आपला ट्राय फोल्ड फोन लॉंच केल्यास, जागतिक बाजारात हा फोन लॉंच करणारी ती पहिली कंपनी असेल.

Huawei Mate XT चे तपशील : Huawei Mate XT मध्ये 6.4-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. या मोबाईलमध्ये 10.2 इंच डिस्प्ले आहे. यामध्ये स्क्रीन दोनदा फोल्ड होते.

Huawei Mate XT चा कॅमेरा सेटअप : Huawei Mate XT मध्ये 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा असेल. दुय्यम कॅमेरा 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे. तिसरा कॅमेरा 12-मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स आहे, जो 5.5x ऑप्टिकल झूम ऑफर करतो. यात 5,600mAh सिलिकॉन कार्बन बॅटरी वापरण्यात आली आहे.

हे वाचलंत का :

  1. मोबाईलवरून काही मिनिटांत जाणून घ्या तुमचं PF बॅलन्स, तुमचं EPFO पासबुक कसं तपासायचं?
  2. पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरू : 1 कोटी युवकांना रोजगाराची संधी, 'असा' करा अर्ज
  3. मोबाईलवरून काही मिनिटांत जाणून घ्या तुमचं PF बॅलन्स, तुमचं EPFO पासबुक कसं तपासायचं?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.