अल अमेरत (ओमान) IND A vs AFG A Live Streaming : भारत अ राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध अफगाणिस्तान अ राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात ACC पुरुष T20 इमर्जिंग टीम एशिया कपचा दुसरा उपांत्य सामना अल अमेरत क्रिकेट ग्राउंडवर आज खेळवला जाईल. या वर्षी वरिष्ठ संघ चार वेळा आमनेसामने आले आहेत, तर 25 ऑक्टोबर रोजी ACC पुरुष T20 इमर्जिंग टीम्स आशिया कपच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तान अ आणि भारत अ एकमेकांना सामोरं जातील.
भारतीय संघ आतापर्यंत अपराजित : वरिष्ठ संघानं अद्याप कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा पराभव केलेला नाही, त्यामुळं अफगाणिस्तान अ संघाला शुक्रवारी अल अमेरतमध्ये भारत अ संघाचा पराभव करुन मोठा पराक्रम करायची संधी असेल. मात्र, अफगाणिस्तानसाठी स्पर्धेतील एकमेव अपराजित संघाविरुद्ध विजय मिळवणं सोपं नाही, हे सत्य नाकारता येणार नाही. आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या बाबतीत, काही अफगाण खेळाडू त्यांच्या भारतीय खेळाडूंपेक्षा अनुभवी आहेत, परंतु भारतीयांचा इंडियन प्रीमियर लीगचा अनुभव त्यांना खूप वेगळा बनवतो.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ या संघात आत्तापर्यंत एकही सामना T20 फॉरमॅटमध्ये खेळला गेला नाही. मात्र दक्षिण आफ्रिका अ संघाची तिरंगी मालिका 2017 मध्ये भारत अ आणि अफगाणिस्तान अ संघ केवळ दोनदाच आमनेसामने आले आहेत. या दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये भारत अ संघानं अनुक्रमे 113 धावा आणि सात गडी राखून विजय मिळवला होता.
भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ सामना कधी आणि कुठं होईल?
भारतीय अ विरुद्ध अफगाणिस्तान अ क्रिकेट संघ यांच्यात दुसरा उपांत्य सामना अल अमेरत क्रिकेट ग्राउंड इथं संध्याकाळी 07:00 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक संध्याकाळी 06:30 वाजता होईल.