राजकोट Ind vs Eng 3rd Test : इंग्लंडविरुद्ध राजकोटमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीत भारतीय कर्णधार रोहित शर्मानं शानदार शतक झळकावलंय. रोहितनं 157 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं आपलं शतक पूर्ण केलंय. कसोटी कारियरमधील हे त्याचं 11वं शतक आहे. याआधी खेळल्या गेलेल्या दोन्ही कसोटींमध्ये रोहित शर्माला फलंदाजीत मोठी खेळी करता आली नव्हती यालरुन त्याच्यावर टिकाही होत होती. आज त्यानं शतक झळकावत टिकाकारांना चांगलंच उत्तर दिलंय. तसंच अष्टपैलू रवींद्र जडेजानही कर्णधाराला चांगली साथ दिलाय. त्यांनही आपलं अर्धशतक पुर्ण केलंय.
रोहित-जडेजानं सावरला डाव : नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहितनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र संघाची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या 33 धावांवर भारतीय संघानं तीन फलंदाज गमावले होते. मात्र यानंतर कर्णधार रोहित आणि जडेजानं भारताचा डाव सावरत दीडशतकी भागीदारी केलीय. सध्या भारतीय संघाच्या 61 षटकांत 3 बाद 224 धावा धाल्या असून शतकवीर रोहित शर्मा 124 आणि रवींद्र जडेजा 78 धावांवर खेळत आहेत. आजच्या दिवसात अजून 29 षटक बाकी आहेत.
सरफराज खान, ध्रुव जुरैलचं डेब्यू :आजच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं चार खेळाडूंना डच्चू दिलाय. मुकेश कुमार, अक्षर पटेल, केएस भरत यांना आजपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात स्थान देण्यात आलं नाही. त्यांच्या जागेवर दोन नवीन खेळाडू भारतीय संघात पदार्पण करणार आहेत. यात के एल राहुलला झालेल्या दुखापतीमुळं सरफराज खानला भारतीय संघात स्थान मिळालंय. तर यष्टीरक्षक के एस भरतच्या जागेवर ध्रुव जुरैलला भारतीय संघात खेळण्याची संधी देण्यात आलीय. मुंबईकर खेळाडू सरफराज खानला भारतीय संघात स्थान मिळाल्यानं मोठा आनंद साजरा करण्यात येत आहे.
मोहम्मद सिराज आणि रवींद्र जाडेजाचं पुनरागमन :नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, "आम्ही अगोदर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. यात काही खेळाडू दुखापतीनं ग्रस्त असल्यानं त्यांच्या जागी इतरांना संधी देण्यात आली आहे. तर काही खेळाडू पुन्हा संघात परतले आहेत. यात मोहम्मद सिराज आणि रवींद्र जाडेजा यांची संघात घरवापसी झाली आहे. ही राजकोटची खेळपट्टी अगोदरच्या दोन खेळपट्ट्यांपेक्षा चांगली दिसत आहे. मात्र खेळ जसा जसा पुढं जाईल, तशी खेळपट्टीची स्थिती बदलेल.