नवी मुंबई : नवी मुंबईतील सानपाडा परिसरात एपीएमसी मार्केटमधील कचरा कंत्राटदार राजाराम ठोके (Rajaram Thoke) यांच्यावर गोळीबार (Firing) झाल्याची घटना घडली आहे. सहा ते सात राऊंड फायरिंग करण्यात आली आहे. या घटनेत राजाराम ठोके गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डीसीपी अमित काळे यांनी दिली.
गोळीबार झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण : नवी मुंबईतील सानपाडा परिसरातील डी मार्ट जवळील लोकांची वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर भर दिवसा सकाळी साडेनऊच्या सुमारास गोळीबार झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन अज्ञात व्यक्ती बाईकवरून येऊन त्यांनी राजाराम ठोके यांच्यावर पाच ते सहा गोळ्या झाडल्या. यातील दोन ते तीन गोळ्या लागून राजाराम ठोके गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोर गोळीबार करून फरार झाले आहेत. नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. तसंच परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या माध्यमातून तपासण्यात येणार असल्याची माहिती डीसीपी अमित काळे यांनी दिली.
ठेकेदारीच्या वादातून हल्ला झाल्याचा संशय : सानपाडा परिसरात ज्या व्यक्तीवर अज्ञात व्यक्तींच्या माध्यमातून गोळीबार करण्यात आला होता त्या व्यक्तीची ओळख पटली आहे. राजाराम ठोके असं या संबंधित व्यक्तीचं नाव असून ते एपीएमसी मार्केटमध्ये कचऱ्याचे ठेकेदार आहेत. राजाराम ठोके यांना दोन ते तीन गोळ्या लागल्या असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठेकेदारीवरून झालेल्या वादातून हा गोळीबार झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर अधिकचा तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा -