महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघासाठी 'शुभ'मन दिन; साहेबांना विजयासाठी विक्रमी आव्हान - शुभमन गिल

IND vs ENG 2nd Test 3rd Day : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ पूर्ण झालाय. आता लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला विजयासाठी 332 धावांची गरज असून त्यांच्या 9 विकेट शिल्लक आहेत.

IND vs ENG 2nd Test 3rd Day
IND vs ENG 2nd Test 3rd Day

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 7:23 PM IST

विशाखापट्टणम IND vs ENG 2nd Test 3rd Day :विशाखापट्टणम इथं भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपलाय. आज दिवसअखेर इंग्लंडनं 399 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 67/1 धावा केल्या आहेत. पहिली विकेट गमावल्यानंतर इंग्लंडनं रिहान अहमदला नाईट वॉचमन म्हणून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलं आणि तो आपली विकेट वाचवण्यात यशस्वी ठरला.

शुभमन गिलचं शानदार शतक : तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारताच्या दुसऱ्या डावानं झाली. यावेळी यशस्वी जैस्वाल 17 चेंडूत 15 धावा आणि कर्णधार रोहित शर्मा 19 चेंडूत 13 धावा करत खेळत होता. तिसरा दिवस भारतासाठी काही खास नव्हता कारण त्यांनी तीनही सत्रं न खेळता सर्व 10 विकेट गमावल्या. फिरकीपटू टॉम हार्टलीनं इंग्लंडकडून सर्वाधिक 3 बळी घेतले. तर भारताकडून शुभमन गिलनं शानदार शतक झळकावलं. त्यानं 147 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 104 धावांची खेळी केली.

साहेबांना विजयासाठी 332 धावांची गरज : दिवसाच्या तिसऱ्या सत्रात भारतीय संघाचा दुसरा डाव 255 धावांवर आटोपला. दोन्ही डावात फलंदाजी केल्यानंतर भारतानं इंग्लंडसमोर 399 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. याला प्रत्युत्तर देताना तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडनं 1 गडी गमावून 67 धावा केल्या आहेत. आता उरलेल्या दोन दिवसात त्यांना विजयासाठी 332 धावांची गरज असून 9 विकेट्स शिल्लक आहेत.

  • दुसऱ्या डावात अश्विननं घेतली एक विकेट : दिवसअखेरीस इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्रॉली 50 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं नाबाद 29 धावा आणि रिहान अहमद 8 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीनं नाबाद 9 धावांवर खेळत आहेत. दुसऱ्या डावात भारताकडून रविचंद्रन अश्विननं 1 बळी घेतला. दिवसअखेर अश्विननं 2 षटकांत 8 धावा दिल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला चांगली सुरुवात : भारतीय संघानं दिलेल्या 399 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. सलामीला आलेल्या झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. दोघांची ही भागीदारी अश्विननं 11व्या षटकात डकेटची विकेट घेत तोडली. डकेटनं आक्रमक खेळ करत 27 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीनं 28 धावा केल्या होत्या.

हेही वाचा :

  1. शुभमन गिलचं टीकाकारांना जोरदार उत्तर, पठ्ठ्यानं शतकचं ठोकलं!
  2. जैस्वालच्या द्विशतकानंतर बुमराहची 'यशस्वी' गोलंदाजी; दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाकडं भक्कम आघाडी

ABOUT THE AUTHOR

...view details