मुंबई - बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर काल रात्री काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. यादरम्यान अभिनेता गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या सैफवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. आता याप्रकरणी, अभिनेत्री करिश्मा तन्नानं मोठे विधान केलं आहे. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर, करिश्मा तन्नानं एका संवादादरम्यान म्हटलं, "मी तुमच्याशी बोलत असताना, बाहेर एक वेगळेच दृश्य पाहायला मिळत आहे. सैफच्या घराबाहेर मीडिया आणि पोलीस आहेत. आता ही घटना वांद्रे येथील अनेक इमारतीसाठी एक इशारा आहे. मी सुद्धा अनेकदा माझ्या सोसायटीमध्ये सुरक्षा वाढविण्याची मागणी करत आहे. तसेच गार्ड यांना देखील चांगल्या प्रशिक्षणाची गरज आहे. जर हे गार्ड काही करू शकणार नाही, तर मग कुटुंबाची काळजी कशी घेता घेईल. हे भयानक आहे. "
सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर करिश्मा तन्नानं दिली प्रतिक्रिया : यानंतर करिश्मा तन्नानं पुढं म्हटलं, "मला आशा आहे की, लोक या घटनेनंतर काहीतरी शिकतील. या कुटुंबाबरोबर जे घडले ते योग्य नाही. मला आशा आहे की, आता माझ्या इमारतीच्या सुरक्षेत वाढ होईल आणि काही गार्ड जास्त गेटवर असतील. ही घटना कधी घडली, याबद्दल मला माहित नव्हते. मात्र माझ्या सोसायटीचे काही गार्ड तिथे होते." करिश्मा तन्ना ही करीना आणि सैफच्या शेजारी असलेल्या इमारतीत राहते. दरम्यान घटनेमध्ये सैफ जखमी झाल्यानंतर त्याला त्याचा मोठा मुलगा ब्राहिम अली खाननं लीलावती रुग्णालयमध्ये दाखल केलं होत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर इब्राहिम हा लगेच तिथे पोहचला होता.
सैफ अली खानची प्रकृती ठीक : तसेच करिश्मा तन्नाबद्दल बोलायचं झालं तर तिनं टीव्ही बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. याशिवाय ती अनेक हिट शोमध्ये दिसली आहे. करिश्मानं रणबीर कपूरबरोबर 'संजू' चित्रपटातही काम केलं आहे. तसेच सैफ अली खान सध्या रुग्णालयात असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय अनेक बॉलिवूडमधील स्टार्स हे सैफची प्रकृती पाहण्यासाठी लीलावती रुग्णालयमध्ये जात आहेत.
हेही वाचा :