चेन्नई IND vs BAN 1st Test Day 1 : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघातील पहिला कसोटी सामना चेन्नईत सुरु आहे. या सामन्यात एक असा निर्णय घेण्यात आला, जो चेपॉक इथं खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या इतिहासात 42 वर्षांनंतर पाहायला मिळाला. बांगलादेश संघानं हा निर्णय घेतला आहे. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो चैन्नईच्या मैदानावर 42 वर्षांपूर्वी घेतला होता. बांगलादेशच्या निर्णयामुळं भारतीय संघासोबत असंच काहीसं घडलं, जे केवळ नवव्यांदा मायदेशात होताना दिसत आहे.
चेन्नईत 42 वर्षांनंतर पाहायला मिळालं : वास्तविक बांगलादेशच्या संघानं या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 1982 साली चेन्नईत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात असा प्रकार पाहायला मिळाला होता, जेव्हा एका संघानं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या दरम्यानच्या काळात इथं 21 कसोटी सामने खेळले गेले, परंतु प्रत्येक वेळी नाणेफेक जिंकणाऱ्या संघानं प्रथम फलंदाजी केली.
भारतीय संघासोबत हे नवव्यांदा घडलं : नाणेफेक जिंकल्यानंतर बांगलादेशनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यामुळं, घरच्या कसोटीत भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्याची ही नववी वेळ होती. यापूर्वी 8 वेळा असं घडलं आहे. परंतु, ऑस्ट्रेलिया वगळता इतर संघ विजयाची नोंद करण्यात अपयशी ठरले आहेत. अशा गेल्या 8 प्रसंगी, 6 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत तर ऑस्ट्रेलियानं त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत.
भारत-बांगलादेश चेन्नई कसोटी : चेन्नई इथं खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताची सुरुवात खराब झाली. त्यांच्या पहिल्या तीन मोठ्या विकेट एकापाठोपाठ पडल्या. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज हसन महमूदने भारताचे पहिले तीन बळी घेतले. रोहित शर्मानं 19 चेंडू खेळून केवळ 6 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या शुभमन गिलला 8 चेंडू खेळून खातंही उघडता आलं नाही. तर विराट कोहलीनंही 6 धावा केल्या.
हेही वाचा :
- भारत विरुद्ध बांगलादेश पहिला कसोटी सामना 'इथं' पाहता येणार 'फ्री'मध्ये लाईव्ह... वाचा सर्व अपडेट - IND vs BAN 1st Test Live Streaming
- भारत-बांगलादेश कसोटी मालिकेत होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम; 58 धावा करताच कोहली करणार 'विराट' विक्रम - IND vs BAN 1st test