कराची Indian Flag Controversy in Pakistan : सध्या क्रिकेट विश्वात ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचं वातावरण आहे. यावेळी पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. यानंतर, टीम इंडिया 20 फेब्रुवारी रोजी आपला सामना खेळेल. यावेळी पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद मिळालं असलं तरी टीम इंडिया आपले सामने दुबईमध्ये खेळणार आहे. आता सामन्याला फक्त काही दिवस उरले आहेत आणि यादरम्यान पाकिस्ताननं असं कृत्य केलं आहे की ज्यानं नीचपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अगदी आधी पाकिस्तानच्या या कृतीनं सर्वांनाच धक्का बसला आहे.
No Indian flag in Karachi: As only the Indian team faced security issues in Pakistan and refused to play Champions Trophy matches in Pakistan, the PCB removed the Indian flag from the Karachi stadium while keeping the flags of the other guest playing nations.
— Nawaz 🇵🇰 (@Rnawaz31888) February 16, 2025
- Absolute Cinema,… pic.twitter.com/2zmcATn7iQ
टीम इंडिया पाकिस्तानमध्ये सामने खेळणार नाही : वास्तविक, आयसीसीनं 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानला दिलं आहे. पण बीसीसीआयनं टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला. बऱ्याच वेळा उशीर झाल्यानंतर, अखेर भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला. भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. जर टीम इंडिया सेमीफायनल आणि फायनलमध्ये पोहोचली तर ते सामनेही तिथंच होतील. जेव्हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला वाटलं की ते या आयसीसी स्पर्धेचं यजमानपद गमावू शकतात, तेव्हा त्यांनी ते मान्य केलं.
कराची स्टेडियमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी कराची इथं खेळला जाईल. यामध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडचं संघ एकमेकांसमोर येतील. हे सामने पाकिस्तानमधील कराची, लाहोर आणि रावळपिंडी या तीन ठिकाणी खेळवले जातील. दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे, जो कराचीचा असल्याचं सांगितलं जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या सर्व देशांचे झेंडे त्यात लावण्यात आले आहेत, परंतु भारतीय तिरंगा गायब आहे. भारत वगळता सर्व सात देशांचे झेंडे स्पष्टपणे दिसतात. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#Pakistan didn't host #Indian flag over #Gaddafistadium and #Pakistan also hosted #Taliban 🏳️ white flag instead of #Afghanistan 🇦🇫 tri colour flag . pic.twitter.com/loccF8tjcG
— Zeitung (@Himat75) February 7, 2025
सोशल मीडियावरील व्हिडिओनं खळबळ : कराची स्टेडियमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिथंही गोंधळ उडाला आहे. चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे की पाकिस्ताननं असं का केलं आहे. याचं उत्तर असं असू शकतं की भारतीय संघ कराचीमध्ये त्यांचे सामने खेळणार नाही, म्हणून हे केलं गेलं, परंतु मुद्दा असा आहे की असे अनेक संघ आहेत जे कराचीमध्ये सामने खेळणार नाहीत, परंतु त्यांच्या ध्वजांना स्थान देण्यात आलं आहे, मग भारतीय तिरंग्याबद्दल इतकी चिडचिड का आहे? हे प्रकरण आता वाढू शकतं, पुढं काय होतं ते पहावं लागेल.
हेही वाचा :