दुबई ICC Champions Trophy Schedule : बहुप्रतिक्षित चॅम्पियन्स ट्रॉफी टूर्नामेंट सुरू होण्यास 60 दिवसांपेक्षा कमी दिवस शिल्लक आहे आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं वेळापत्रक आलं आहे. गेल्या अनेक आठवड्यापासून सुरू असलेल्या बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यातील वादावर तोडगा काढल्यानंतर अखेर आयसीसीनं स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केलं. या स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना न्यूझीलंड आणि यजमान पाकिस्तान यांच्यात कराची येथे होणार आहे. तर फायनल 9 मार्च रोजी होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे, ज्याची बीसीसीआय आधीच मागणी करत होती. तसंच हाय व्होल्टेज भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 फेब्रुवारीला दुबईत होणार आहे.
हायब्रीड मॉडेलमध्ये होणार चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारत सरकारनं टीम इंडियाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिली नाही. यामुळं बीसीसीआयनं ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित करण्याची मागणी केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये या मुद्द्यावरून वाद सुरू होता. त्यामुळं स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर होण्यास सुमारे महिनाभराचा विलंब झाला. आता ही स्पर्धा संकरित मॉडेलमध्ये खेळण्यास सहमती दिल्यानंतर आयसीसीनंही वेळापत्रकाला मान्यता दिली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक
- 19 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची
- 20 फेब्रुवारी- भारत विरुद्ध बांगलादेश, दुबई
- 21 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची
- 22 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर
- 23 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई
- 24 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी
- 25 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी.
- 26 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर.
- 27 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी.
- 28 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर.
- 1 मार्च - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची.
- 2 मार्च- न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई.
- 3 मार्च- उपांत्य फेरी 1, दुबई
- 5 मार्च- उपांत्य फेरी 2, लाहोर
- 9 मार्च- अंतिम- लाहोर/दुबई.