कोलकाता How to Buy Tickets :भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात पाच सामन्यांची T20 मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ही मालिका 22 जानेवारीपासून सुरु होईल. या दौऱ्यात प्रथम T20 मालिका खेळवली जाईल. या मालिकेसाठी इंग्लंडनं 22 डिसेंबर रोजी आपला संघ जाहीर केला आहे. जॉस बटलरला T20 आणि वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर, 11 जानेवारी रोजी टीम इंडियाची घोषणाही करण्यात आली आहे.
कोलकाताला होणार पहिला सामना : या मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे, तर जॉस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ कठीण आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. या मालिकेत घरच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न टीम इंडिया करेल. सूर्यकुमार यादव हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि तो मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात फटके मारु शकतो.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत भारत आणि इंग्लंडमध्ये रोमांचक स्पर्धा दिसून आली आहे. दोन्ही संघ T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 24 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यात भारतानं 13 सामने जिंकले आहेत. तर, इंग्लंड संघानं 11 सामने जिंकले आहेत. घरच्या मैदानावर खेळताना, टीम इंडियानं इंग्लंडविरुद्ध सहा T20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. तर पाच सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.