नागपूर How to Buy Match Tickets : भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघांतील पहिला वनडे सामना नागपूरच्या जामठा स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्याच्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 06 फेब्रुवारी रोजी नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर खेळला जाईल.
5 वर्षांनी होणार वनडे सामना :भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना अशा ठिकाणी खेळला जाईल जिथं कसोटी सामना खेळला गेला आहे. परंतु गेल्या पाच वर्षांत एकही वनडे सामना खेळला गेला नाही. हा सामना नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. 2019 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इथं शेवटचा वनडे सामना खेळला गेला होता. या मालिकेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तान आणि यूएईमध्ये होणार आहेत. भारतीय संघ दुबईमध्ये खेळेल पण इंग्लंड संघाला पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी जावं लागेल. तयारीच्या बाबतीत, या मालिकेपेक्षा चांगलं काहीही असू शकत नाही. म्हणूनच दोन्ही संघांसाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे.
हेड-टू-हेड रेकॉर्ड :भारत आणि इंग्लंडमध्ये एकूण 107 वनडे सामने खेळले गेले आहेत. ज्यात भारतीय संघानं 58 विजय मिळवले आहेत. तर इंग्लंडनं 44 सामने जिंकले आहेत. तर पाच सामने अनिर्णित राहिले.
कधी आणि कशी खरेदी करायची तिकिटं :या सामन्याची तिकिटं ऑनलाइन उपलब्ध होतील अशी घोषणा केली आहे. आता चाहते डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो मोबाईल अॅपवरुन ऑनलाइन तिकिटं खरेदी करु शकतात. या मालिकेतील प्रत्येक सामना प्रेक्षकांसाठी खास आहे आणि आता तिकिटांची उपलब्धता निश्चित झाली आहे, त्यामुळं चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या सामन्यासाठी कमीत कमी तिकिटाची किंमत ही 800 रुपये आहे तर जास्तीत जास्त 4000 रुपये आहे.