महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारताविरुद्ध 1 षटकार मारताच हेनरिक क्लासेननं रचला इतिहास; 'अशी' कामगिरी करणारा T20 क्रिकेटच्या इतिहासातील चौथा खेळाडू

भारत क्रिकेट संघाविरुद्ध मायदेशात सुरु असलेल्या चार सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा स्टार खेळाडू हेनरिक क्लासेननं एक मोठा विक्रम केला आहे.

Fourth Player to Hit 100 sixes in Calendar Year
हेनरिक क्लासेन (ANI Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 9, 2024, 2:38 PM IST

डरबन Fourth Player to Hit 100 sixes in Calendar Year : भारत क्रिकेट संघाविरुद्ध मायदेशात सुरु असलेल्या चार सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 61 धावांनी दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यात भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 202 धावा केल्या, याच्या प्रत्युत्तरात आफ्रिकन संघ 141 धावांवरच मर्यादित राहिला. मात्र असं असूनही, दक्षिण आफ्रिका संघाचा स्टार खेळाडू हेनरिक क्लासेननं एक मोठा विक्रम केला आहे, ज्यामध्ये तो आता अशा गटाचा एक भाग बनला आहे, ज्यामध्ये पूर्वी फक्त वेस्ट इंडिजचे खेळाडू प्रबळ होते.

क्लासेननं 2024 साली T20 मध्ये 100 षटकार केले पूर्ण :हेनरिक क्लासेननं भारताविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात 22 चेंडूत 25 धावांची खेळी खेळली ज्यात त्याला फक्त एक षटकार मारण्यात यश आलं. यासह क्लासेननं 2024 साली T20 मध्ये 100 षटकारही पूर्ण केले. यासह क्लासेन आता T20 क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात 100 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. तर जागतिक क्रिकेटमधला चौथा खेळाडू ठरला आहे.

वेस्ट इंजिडच्या तीन फलंदाजांनी केला कारनामा :क्लासेनपूर्वी हा पराक्रम फक्त वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या नावावर होता. वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरन, आंद्रे रसेल आणि ख्रिस गेल यांनी हा कारनामा केला होता. पुरननं या वर्षीच हा पराक्रम केला आहे, तर रसेलनं 2019 मध्ये 100 हून अधिक षटकार मारले होते. तर ख्रिस गेलनं हा पराक्रम 6 वेळा केला आहे. क्लासेनबद्दल सांगायचं तर, या वर्षी त्याची फलंदाजी या प्रकारामध्ये जोरदार दिसली आहे, ज्यामध्ये त्यानं सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना 2024 च्या आयपीएल हंगामात एकूण 38 षटकार ठोकले होते.

T20 क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात 100 हून अधिक षटकार ठोकणारे खेळाडू :

  • ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) - 6 वेळा
  • निकोलस पुरन (वेस्ट इंडिज) - वर्ष 2024
  • आंद्रे रसेल (वेस्ट इंडिज) - वर्ष 2019
  • हेनरिक क्लासेन (दक्षिण आफ्रिका) - वर्ष 2024

हेही वाचा :

  1. राजकारणानंतर आता क्रिकेटमध्येही 'बंद दाराआड' चर्चा; BCCI कडून सहा तास रोहित-गंभीरवर प्रश्नांची सरबत्ती
  2. आश्चर्यच... सूर्याची विकेट घेण्यासाठी पठ्ठ्यानं एका ओव्हरमध्ये टाकले 11 चेंडू; पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details