पॅरिस Brazilian swimmer Without Hand : ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकसारख्या जागतिक दर्जाच्या खेळांमध्ये जिद्दीची अनेक उदाहरणं आहेत. असंच एक उदाहरण आहे ब्राझीलच्या एका जलतरणपटूचं. यापूर्वी 7 महिन्यांची गरोदर असूनही पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये इजिप्शियन फेन्सरनं जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं.
ब्राझिलच्या खेळाडूची अविश्वसनीय कामगिरी : असे अनेक पॅरालिम्पिक खेळाडू आहेत ज्यांना दोन्ही हात नसतानाही पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भाग घेत आहेत. ते केवळ पॅरालिम्पिकमध्येच सहभागी होत नाहीत तर पदकंही जिंकत आहेत. ज्यात भारताची महिला शितल देवीचाही सामावेश आहे आणि इतर देशांतील जलतरणपटूही आहेत जे हातांशिवाय पोहून पदक जिंकत आहेत. पण हातांशिवाय कोणाला पोहता येतं का असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? तो केवळ पोहत नसून पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदकही जिंकू शकतो. होय, असाच एक खेळाडू ब्राझीलचा आहे ज्याने दोन्ही हातांनी अपंग असूनही पोहण्याच्या माध्यमातून आपलं नावलौकिक मिळवलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हाताशिवाय कोणी पोहतो कसं, हे सर्वसामान्यांच्या समजण्याच्या पलीकडं आहे.
ब्राझीलचा जलतरणपटू गॅब्रिएल झिन्होनं रचला इतिहास : पण ब्राझीलचा जलतरणपटू गॅब्रिएल झिन्होनं पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तिसरं सुवर्णपदक जिंकून केवळ इतिहासच रचला नाही तर हातांशिवाय पोहणं शक्य आहे हे लोकांना दाखवून दिलं. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये जलतरणात तिसरं सुवर्णपदक जिंकल्यानंतर प्रेक्षकांनी त्याचं उभं राहून अभिनंदन केलं. एकही हात किंवा हात आणि तुटलेला पाय नसलेल्या 22 वर्षीय जलतरणपटू गॅब्रिएलनं 100 मीटर बॅकस्ट्रोक आणि 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण जिंकल्यानंतर 200 मीटर फ्रीस्टाइलच्या S2 प्रकारात सुवर्ण जिंकून इतिहास रचला. गॅब्रिएल गेराल्डो डॉस सँटोस अरौजो, ज्याला गेब्रियल झिन्हो म्हणून ओळखले जातं, यानं 200 मीटर फ्रीस्टाइल जलतरणात 3 मिनिटं 58.92 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकलं. यापूर्वी त्यानं टोकियो 2020 मध्ये दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकलं होतं. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, S2 श्रेणीमध्ये अशा जलतरणपटूंचा समावेश आहे ज्यांचे पाय आणि हात अधिक प्रभावित आहेत. हे जलतरणपटू मुख्यतः त्यांच्या हात आणि खांद्यापासून निर्माण होणारी ऊर्जा वापरुन पोहतात.
हेही वाचा :
- पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सांगलीचा पठ्ठ्या चमकला... देशाला मिळवून दिलं रौप्यपदक - Paris Paralympics 2024