मँचेस्टर England vs Australia 3rd T20I Live Streaming : इंग्लंड क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी 20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना 11 सप्टेंबर रोजी झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं यजमान इंग्लंडचा 28 धावांनी पराभव केला. यानंतर 13 सप्टेंबर रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यात यजमान इंग्लंडनं तीन विकेट राखत विजय मिळवून मालिकेत बरोबरी केली. यानंतर आज या मालिकेतील तिसरा सामना होणार आहे. हा सामना जिंकत दोन्ही संघांचा मालिका जिंकण्याचा प्रयत्न असेल.
नवीन खेळाडूंसह इंग्लंड मैदानात :इंग्लंडसाठी, श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर लगेचच ही टी 20 मालिका सुरु झाली. त्यामुळं यात अनेक दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. परिणामी यजमान इंग्लंड संघानं नवीन खेळाडूंसह टी 20 मालिकेला सुरुवात केली. यानंतर पहिल्या सामन्यात त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं, मात्र दपसऱ्या सामन्यात त्यांनी दमदार पुनरागमन करत कांगारुंचा पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली. पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी दोन्ही संघ 3 टी 20 आणि 5 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहेत. भारतातील अनेक चाहत्यांना हा सामना पाहायची इच्छा आहे, म्हणून हा सामना भारतात कधी, कुठं आणि कसा पाहता येईल ते जाणून द्या.
- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा टी 20 सामना कधी होणार?
उभय संघांमधील तिसरा टी 20 सामना 15 सप्टेंबर रोजी होणार असून हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होईल.
- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा टी 20 सामना कुठं खेळला जाईल?
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी 20 सामना मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या टी 20 सामन्याचं भारतात कोणते टीव्ही चॅनेल प्रसारण करतील?