ETV Bharat / entertainment

ओटीटी गाजवून मोठ्या पडद्यावर नशीब आजमावयाला येतोय आशिम गुलाटी! - Aashim Gulatis new movie - AASHIM GULATIS NEW MOVIE

Aashim Gulati Exclusive Interview : आशिम गुलाटीचा आगामी 'कहाँ शुरु कहाँ खतम' चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Aashim Gulati Exclusive Interview
आशिम गुलाटीची खास मुलाखत (Reporter)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 19, 2024, 6:02 PM IST

मुंबई - Aashim Gulati Exclusive Interview : अभिनेता आशिम गुलाटीला प्रामुख्यानं ओटीटी माध्यमावर काम करताना पाहिलं असून, तिथं त्यानं चांगलंच नाव कमावलं आहे. हँडसम हंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशिमनं 'गुलमोहर ग्रँड', 'ताज: डिव्हायडेड बाय लव्ह', 'जी करदा' यांसारख्या कलाकृतींतून प्रसिद्धी मिळवली आहे. आता त्याचा 'कहाँ शुरु कहाँ खतम' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यानिमित्तानं आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी आशिम गुलाटीबरोबर गप्पा मारल्यात, आशिमने त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल काय म्हटलं हे जाणून घेऊ यात...

  • एक सोलो हिरो म्हणून तुझा चित्रपट 'कहाँ शुरु कहाँ खतम' लवकरच रिलीज होतोय. काय भावना आहेत?

    "म्हणतात ना 'बटरफ्लाईज ईन द स्टमक', तसंच काहीसं आहे. खरं तर वाघ, सिंह इत्यादींचे संकट संपूर्ण प्राणिसंग्रहालयाच्या आतमध्ये धुडगूस घालत असते. सर्व प्राणी बंद पिंजऱ्यात नसून, मोकाट सुटलेले असतात, असंच काहीसं झालंय. सिनेमा करताना थोडा नर्व्हसनेस असला तरी तो पॉझिटिव्ह नर्व्हसनेस आहे. खूप मेहनतीनं आम्ही हा सिनेमा तयार केला आणि मी माझे काम प्रामाणिकपणे केले. देवाचे प्रेम, आईचा आशीर्वाद आहेच आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळेल ही आशा आहे.
  • तू ओटीटीवर बरंच काम केलं आहेस. हा पिक्चर करण्याचा अनुभव कसा होता?

    "अर्थातच चांगला. ओटीटीवर तुम्ही तुमची व्यक्तिरेखा खोलवर साकारू शकता. हा लॉन्ग फॉरमॅट असल्यामुळं कॅरॅक्टर बिल्डिंगला यात जास्त स्कोप आहे. व्यक्तिरेखेचे पैलू सविस्तरपणे साकारता येतात. परंतु चित्रपटामध्ये फक्त दोन तासांमध्ये तुम्हाला तुमची व्यक्तिरेखा सादर करायची असते. पात्राची बॅकस्टोरी दाखवली जात नसते, त्यामुळे त्याचं भान ठेवून भूमिका सादर करावी लागते. दोन्ही माध्यमांमध्ये बाकी सर्व सारखंच असतं."
  • तू वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेस. या चित्रपटाच्या निमित्तानं तू कॉमेडी जॉनर हाताळत आहेस. त्याबद्दल काय सांगशील?

    "मी माझ्या करिअरमध्ये 'कहाँ सुरू कहाँ खतम'मधून कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी व्हावा हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. कॉमेडी म्हणजे तारेवरची कसरत असते. कॉमिक टायमिंग सांभाळणं नितांत गरजेचं असतं. त्यात जर का चुकलं तर सगळ्यांचा बट्याबोळ होतो. यात मला लाऊड कॉमेडी करायची होती. हा प्रकार मी पहिल्यांदाच हाताळत होतो, त्यामुळे थोडी भीती वाटत होती. मी डबिंग करताना यातील विनोदी प्रसंग मला खूप भावले आणि ते इतरांना म्हणजे प्रेक्षकांना आवडतील, असं मला वाटते.

'कहाँ शुरु कहाँ खतम' कधी होणार प्रदर्शित : आशिम गुलाटी आणि नवोदित अभिनेत्री व प्रसिद्ध पॉप स्टार ध्वनी भानुशाली अभिनीत 'कहाँ शुरु कहाँ खतम' 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.