चेन्नई R Ashwin century On Day 1 of Chennai Test : भारतीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला शानदार सुरुवात झाली आहे. गुरुवारपासून (19 सप्टेंबर) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी स्टार फिरकी अष्टपैलू रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांची फलंदाजी चांगलीच पाहायला मिळाली. सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघानं 80 षटकांत 6 बाद 339 धावा केल्या होत्या. अश्विन (102) आणि जडेजा (86) नाबाद आहेत.
Ravi Ashwin - an icon for India. 🇮🇳
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 19, 2024
- Build a statue for the greatest ever from Tamil Nadu. 🐐 pic.twitter.com/Brd7DWD1sE
भारताला अडचणीतून काडलं बाहेर : या दोघांनी आपल्या फलंदाजीनं बांगलादेशी गोलंदाजांचा समाचार घेतला आणि भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढत मोठी धावसंख्या उभारली. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघानं 34 धावांत तीन विकेट गमावल्या. त्यानंतर संघानं 144 धावांवर 5वी विकेट गमावली. यानंतर जडेजानं सातव्या क्रमांकावर येऊन पन्नास धावा केल्या. आठव्या क्रमांकावर आलेल्या अश्विननं 108 चेंडूत शतक झळकावलं. त्याचं कसोटी कारकिर्दीतील हे सहावं शतक होतं. याआधीही अश्विननं फेब्रुवारी 2021 मध्ये चेन्नईमध्ये शतक झळकावलं होतं. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत त्यानं शतक झळकावलं. त्यानं आपल्या शतकी खेळीत 10 चौकार आणि 2 षटकार मारले.
Ashwin - 102* (112).
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 19, 2024
Jadeja - 86* (117).
Jaiswal - 56 (118).
Pant - 39 (52).
INDIA 339/6 ON DAY 1 STUMPS - THE DAY BELONGS TO ASHWIN AND JADEJA. 🇮🇳 pic.twitter.com/EBDAAlI3eb
शतक झळकावत रचला इतिहास : भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं (अण्णा) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर फलंदाज म्हणून विक्रमी कामगिरी केली. जे त्याचं घरचं मैदान आहे. रविचंद्रन अश्विननं कसोटी क्रिकेटमधील सहावं शतक झळकावलं. या खेळीसह त्यानं अनेक विक्रम रचले. बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यानं संघ अडचणीत असताना फलंदाजी करत दमदार शतक झळकावलं. या शतकासह आर अश्विन हा जगातील एकमेव फलंदाज आहे, ज्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 500 हून अधिक बळी घेतले आहेत आणि 6 शतकं झळकावली आहेत. आर अश्विननं रवींद्र जडेजासोबत बांगलादेशविरुद्ध सातव्या विकेटसाठी भारतासाठी सर्वात मोठी भागीदारीही केली.
A Heroic HUNDRED in 📸📸 @ashwinravi99, that was special 👌👌
— BCCI (@BCCI) September 19, 2024
Scorecard - https://t.co/jV4wK7BgV2#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/J70CPRHcH5
अश्विन-जडेजाची 195 धावांची विक्रमी भागीदारी : पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत अश्विन 112 चेंडूत 102 धावा करुन नाबाद तर जडेजा 117 चेंडूत 86 धावा करुन नाबाद परतला. आता हेच दोन फलंदाज दुसऱ्या दिवसाची सुरुवात करतील. दुसऱ्या दिवशी जडेजाही आपलं शतक पूर्ण करण्याकडं लक्ष देईल. पहिल्या दिवशी अश्विन आणि जडेजा यांच्यात 227 चेंडूत 195 धावांची नाबाद विक्रमी भागीदारी झाली. यासह जडेजा-अश्विननं मिळून बांगलादेशविरुद्ध सातव्या किंवा त्याहून खालील क्रमांकाच्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम केला. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकर आणि झहीर खानच्या नावावर होता, ज्यांनी दहाव्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी केली होती.
That's Stumps on the opening Day of the Chennai Test! #TeamIndia slammed 163 runs in the final session, courtesy ton-up R Ashwin and Ravindra Jadeja 🔥 🔥
— BCCI (@BCCI) September 19, 2024
We will be back for Day 2 action tomorrow! ⌛️#INDvBAN | @IDFCFIRSTBank
Scorecard - https://t.co/jV4wK7BgV2 pic.twitter.com/LdgKN746Xe
बांगलादेशला दमदार सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही : बांगलादेशसाठी पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाज हसन महमूद सर्वात यशस्वी ठरला, त्यानं 4 बळी घेतले. याशिवाय नाहिद राणा आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. बांगलादेशच्या संघानं 34 धावांत 3 गडी बाद करत भारतीय संघाला अडचणीत आणलं होतं. मात्र, त्याचा फायदा त्यांना उठवता आला नाही.
हेही वाचा :