ETV Bharat / politics

‘वन नेशन वन इलेक्शन’ म्हणजे अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा भाजपाचा डाव; जयंत पाटील यांची टीका - Jayant Patil

Jayant Patil : बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळानं ‘वन नेशन वन इलेक्शन’ (One Nation One Election) या निवडणूक प्रक्रियेला मंजूरी दिली. आपल्या देशात 'वन नेशन वन इलेक्शन' आणून अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणणे हा भाजपाचा डाव असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

Jayant Patil
जयंत पाटील (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2024, 5:59 PM IST

मुंबई Jayant Patil : केंद्रीय मंत्रिमंडळाने 'वन नेशन वन इलेक्शन' (One Nation One Election) निवडणूक प्रक्रियेला मंजुरी दिल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आपल्या देशात संघराज्य पद्धत आहे. या देशात 'वन नेशन वन इलेक्शन' करून अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा भाजपाचा डाव आहे. संविधान बदलण्याच्या प्रकारमुळं भाजपाला लोकसभेत मोठा फटका बसला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात निर्माण केलेली लोकशाही रचना मोडून काढायच्या दिशेने 'वन नेशन वन इलेक्शन'चं पाऊल असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

घटनेतील तरतूद मोडून काढण्याचा प्रयत्न : लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. आता 2027 ला आशा प्रकारे 'वन नेशन वन इलेक्शन' घेऊन टाका. यातून आता नवीन गोंधळ तयार करण्याचं काम सुरू आहे. ज्या देशांमध्ये सात टप्प्यात लोकसभा निवडणुका घेतात, त्यांना अशा प्रकारे निवडणुका घेणं शक्य आहे का? देशातील काही राज्यांमध्ये निवडणुका होतात. त्यावेळेस केंद्रातील सरकारला जागरुक राहावं लागतं. या प्रकारच्या मोठ्या घोषणा करणं म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत तरतूद केलीय ती मोडून काढायचं काम आहे. 'वन नेशन वन इलेक्शन' नंतर देशात प्रेसिडेन्शिअल पद्धत आणण्याचा मार्ग असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं. 1970 आणि 2024 मध्ये देशातली परिस्थिती बदललेली आहे. 1970 साली निवडणुका एकत्रित झाल्या होत्या.

प्रतिक्रिया देताना जयंत पाटील (ETV BHARAT Reporter)

जागा वाटपासंदर्भात मतभेद नाही : विधानसभा निवडणुकीत महायुतीतील भाजपाला 50 जागा कमी मिळू शकतात अशा प्रकारचा सर्वे समोर आला आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, त्या रिपोर्टविषय मला माहीत नाही. मात्र, तुतारी राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय ते पाहता त्या रिपोर्टमध्ये तथ्य आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात वेगवेगळ्या बातम्यामध्ये काहीही आलं तरी, विभागवार आम्ही चर्चा करत आहोत. आज काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळं महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेनेसह आम्ही एकत्र बसून चर्चा करणार आहोत. जागा वाटपासंदर्भातील चर्चा अतिशय चांगल्या सुरू आहेत. महाविकास आघाडीत जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाहीत. नागपूरमधील प्रकल्प गुजरातमध्ये गेले, कारण की महाराष्ट्रातील नेतृत्वाची गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रकल्पाला मागे आणायची ताकद नसल्याचं म्हणत त्यांनी महायुती सरकारला टोला लगावला.

हेही वाचा -

  1. "देवेंद्र फडणवीसांच्या मनात काय चाललंय हे अमित शाहांना..."; जयंत पाटलांचा हल्लाबोल - Jayant Patil on BJP
  2. जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीत मिठाचा खडा; शेकापचे दोन उमेदवार घोषित झाल्यानं आघाडीत बिघाडी? - Jayant Patil
  3. महाराष्ट्रातून भाजपा घालवा, मग दिल्लीतील मोदी सरकार घालवायला वेळ लागणार नाही, जयंत पाटील यांचा हल्लाबोल - Jayant Patil On BJP

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.